Download App

कोर्लई गावच्या 19 बंगले प्रकरणात माजी सरपंचाला बेड्या, रश्मी ठाकरेंच्या अडचणीत वाढ?

  • Written By: Last Updated:

19 Bungalows in Korlai update : अलीबागमधील कोर्लई येथील 19 बंगले (19 Bungalows in Korlai) रश्मी ठाकरेंच्या (Rashmi Thackeray) नावाने अधिकृतपणे बांधण्यात आले होते. पण नंतर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांनी आरोप केला की, हे बंगले पाडण्यात आले. त्यांतर आता या कोर्लई गावातील कथित 19 बंगले घोटाळा प्रकरणात रेवदंडा पोलिसांनी (Revdanda Police) माजी सरपंच प्रशांत मिसाळ (Prashant Misal) यांना अटक केली आहे. काल रात्री 10 साडे आठ वाजता पोलिसांनी मिसाळांवर अटकेची कारवाई केली. त्यामुळे रश्मी ठाकरेंच्या अडचणीत वाढ झाली आहे.

रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर यांच्या नावे कोर्लही येथे जमीन आहे. या जागेत असलेल्या कथित बंगल्या प्रकरणी सोमय्यांनी घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. त्यानंतर
कोर्लही येथील कथित 19 बंगले प्रकरणात रेवदंडा पोलिसांनी 6 जणांविरुध्द गुन्हे दाखले केले होते. शासनाची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली दाखल करण्यात आलेल्या या गुन्ह्यात कोर्लई ग्रामंपचायतीने तात्कालिन ग्रामसेवक, सरपंच आणि सदस्यांचा समावेश आहे. आता माजी सरपंच प्रशांत मिसाळ यांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

कोर्लईतील या कथित 19 बंगले प्रकरणात खोटी कागदपत्रे तयार करून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप आहे. भारतीय दंड विधान 420, 465, 466, 468 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल झालेला आहे. मुरूडच्या ग्राम विकास अधिकारी संगिता भांगरे यांनी यासंदर्भात रेवदंडा पोलिसांत तक्रार दिली होती.

या तक्रारीनंतर रेवदंडा पोलिसांनी कोर्लई गावचे तत्कालिन ग्रामसेवक विनोद मिंडे यांच्यासह देवंगणा वेटकोळी, देविका म्हात्रे, गोविंद चंदर वाघमारे, रेश्मा रमेश मिसाळ, रेमा रमेस पिटकर आणि प्रशांत जाणू मिसाळ यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपाल पोलिस करत असून पहिला अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

मासिक पाळीतील स्वच्छतेबाबत एकसमान राष्ट्रीय धोरण लागू करण्याचे SC चे निर्देश

सोमय्या यांनी या प्रकरणात आरोप केले होते. त्यांनी केलेल्या आरोपानुसार, रश्मी ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्यात या जमीनी संदर्भात काही व्यवहार झाले होते. उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, रवींद्र वायकर, मनीषा वायकर यांच्या नावावर मुरूड तालुक्यातील कोर्लई गावात जमीन खरेदी केली होती. या जागेवर 19 बंगले होते, पण त्यांची नोंद कॅन्सल केल्याचा आरोप आहे.

रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर यांनी 2014 मध्ये अन्वय नाईक यांच्याकडून कोर्लई गावातील जागा तिथे झालेल्या बांधकामासह विकत घेतली. या जागेवर 19 बंगले असल्याची नोंद ग्रामपंचायतीत होती. त्याची घरपट्टी अन्वय नाईक भरायचे, असा आरोप आहे.

19 बंगले रश्मी ठाकरे, मनीषा वायकर यांच्या नावे करण्यात आले. त्यांची घरपट्टीही भरली गेली. मात्र, नंतर हे प्रकरण अंगलट येण्याच्या भीतीने उध्दव ठाकरे हे सीएम झाल्यानंतर 2022 मध्ये जमीन व्यवहाचे कागदपज्ञे गहाळ करायला लावले, असा आरोप सोमय्यांनी करत या प्रकरणाचा तपास झाला पाहिजे, अशी मागणी केली होती.

सोमय्यांनी आजपर्यंत अनेकांवर आरोप केले होते. त्यापैकी अनेकांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लागला होता. कोर्लई 19 बंगल्यांच्या प्रकणात सोमय्यांनी थेट रश्मी ठाकरे यांच्यावरच आरोप केल्यानंतर आता माजी सरंपचाला अटक केली. त्यामळे पोलिसांचा तपास रश्मी ठाकरेंपर्यंत येणार का, हेच पाहणं औत्सुक्याच आहे.

Tags

follow us