Download App

40 गद्दार आमदारांनी आईच्याच पाठीत खंजीर खुपसला; ठाकरे गटाचे नेते अनंत गीते यांची टीका

  • Written By: Last Updated:

धुळे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी 40 आमदार आणि 12 खासदारांसह शिवसेनेतून (Shivsena) बाहेर पडत उद्धव ठाकरे यांना काही महिन्यांपूर्वी धक्का दिला होता. त्यानंतर आता केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदेंच्या बाजूने धनुष्यबाणाचा निर्णय दिला. आयोगाच्या या निर्णयानंतर ठाकरे गट चांगलाच अॅक्शन चांगलाच मोडमध्ये आला आहे. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर ठाकरे गटाकडून शिंदे गटावर सातत्याने टीका केली जाते आहे. आता माजी खासदार अनंत गीते (MP Anant Geete) यांनीही मुख्यमंत्र्यांसह शिवसेनेतून गेलेल्या 40 आमदारांना राजकीय वारसा नाही, अशा शब्दात शिंदे गटावर टीकास्त्र डागलं. धुळ्यात झालेल्या पत्रकार परिषदेत अनंत गीतेंनी हे वक्तव्य केलं आहे.

अनंत गीते म्हणाले, मुख्यमंत्र्यांसह शिवसेनेतून गेलेल्या 40 आमदारांना राजकीय वारसा नाही. वारसा हक्काने आलेलं त्यांच्यापैकी एकही जण नाही. राजकीय वारसा कुणालाही नव्हता. या सर्वांचा राजकीय जन्म हा शिवसेनेमुळे झालेला आहे. ज्या शिवसेनेमुळे या सर्वांचा जन्म झाला ती शिवसेना आमची राजकीय माता आहे. आणि त्याच मातेच्या पाठीमध्ये खंजीर शिंदे गटाने खंजीर खुपसला, अशी टीका गीते यांनी केली.

ते म्हणाले, राज्यात नीच राजकारणाने पातळी गाठली आहे. इतके नीच राजकारण महाराष्ट्राने यापूर्वी कधीच पाहीले नव्हते. ‘मातोश्री’वर वाढलेल्या गद्दारांनी आईच्याच पाठीत खंजीर खुपसला आहे. तसेच जनतेच्या हिताशी ह्या गद्दारांना काहीएक देणेघेणे नाही. केवळ सत्तेसाठी त्यांनी स्वतः ला भाजच्या दावणीला बांधून घेतले आहे. अशा या गद्दारांप्रती महाराष्ट्रातील जनतेत प्रचंड संतापाची लाट आहे. या लाटेचे रुपांतर आता आक्रोशात होणार आहे, त्यासाठीच शिवसेनेचे शिवगर्जना अभियान राज्यभरात सुरु केल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान, कुछ देर की खामोशी है, फिर शोर आयेगा, तुम्हारा सिर्फ वक्त आया है, हमारा दौर आयेगा… अशा शब्दात शेरोशायरी करीत त्यांनी विरोधकांना एकप्रकारे गंभीर इशाराही दिला.

धाराशिवच्या न्यायालयाची Bachhu Kadu यांना विचित्र शिक्षा…
 

गीते यांच्या उपस्थितीत आज धुळ्यात शिवगर्जना अभियान पार पडले. या शिवगर्जना अभियानाच्या मेळाव्याला संबोधित करण्यापूर्वी त्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांचा बाईक रॅली काढून रोड शो करण्यात आला. यावेळी जिल्हाभरातील शिवसेनेच्या ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Tags

follow us