कल्याण :’मी बजेटवर अवलंबून नाही, मी कॅपिटल मार्केटमधून पैसे उभे करतो. त्याचबरोबर जो रिटायर, पेंशनर, कॉन्स्टेबल आहे. जो नोकरी करतो त्याला 8 टक्के रिटर्न द्यायचे आणि त्यांच्या पैशातून महामार्ग बांधायचे.’ अशी महामार्ग बांधण्याची योजना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितली ते दि कल्याण जनता सहकारी बँकेच्या ५० व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते.
त्याचबरोबर ते पुढे म्हणाले, 1995 साली मंत्री असताना 1300 कोटींचं बजेट होतं. ठाणे भिवंडी बायपास हा पहिला रस्ता बीओटीवर केला होता. तेव्हा मला प्रश्न विचारण्यात आला होता. की, रस्ते बीओटीवर काढता मग सरकार बीओटीवर का देत नाही ? पण सरकारजवळ पैशांची कमी होती. त्यावेळेस पब्लिक बाँडमध्ये गेलो. हे सगळे रस्ते, पूल केले व त्याचे पैसे वसूल झाले. तीन महिन्यांपूर्वी महाराष्ट्र सरकारने मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गाचा रस्ता विकला आणि 8 हजार कोटी खिशात घातले. मात्र हा पैसा राज्यातील विकास कामासाठी खर्च होणार आहे. वरळी बांद्रा या सगळ्या प्रोजेक्टमध्ये नाईलाज होता. बजेट कमी होते.
त्याचबरोबर यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बँक प्रशासनाचे कौतुक करताना काही सूचना दिल्या. हिंदुस्थानचे इन्फ्रास्ट्रक्चर गरीब माणसांच्या पैशातून उभे करायचे आहे.
‘येणाऱ्या काळात समाजाला सुखी समृध्दी करायचं असेल तर समाजाला ध्वनी प्रदुषण ,जल प्रदूषण आणि वायू प्रदूषणापासून मुक्त केलं पाहिजे.’ असं आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. कल्याणमधील आचार्य अत्रे रंगमंदिरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, कोकण प्रांत संघचालक सतीश मोढ उपस्थित होते.