मुंबई : ‘रेल्वेच्या सर्वच क्षेत्रात मोठी क्रांती होत आहे. देशाला आज नववी आणि दहावी ट्रेन देशाला समर्पित करताना मला अत्यंत आनंद होत आहे.’ असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Train) गाड्यांच्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये आपल्या भाषणाला थेट मराठीत सुरूवात केली. त्यामुळे यावेळी उपस्थितांनी मोठा जल्लोष केला.
पुढे बोलताना मोदी म्हणाले, आजचा दिवस भारतीय रेल्वेसाठी मुंबई आणि महाराष्ट्राच्या आधुनिक कनेक्टिव्हिटीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आज पहिल्यांदा दोन वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे सोबत सुरू होत आहेत. वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे मुंबई आणि पुण्यासारख्या देशाच्या आर्थिक केंद्रांना धार्मिकस्थळांशी जोडणार आहे. यामुळे कॉलेज, ऑफिस शेतकरी या सर्वांना फायदा होणार आहे. तर राज्यात यामुळे पर्यटन आणि तीर्थ यात्रांना प्रोत्साहीत करण्यासाठी मदत करणार आहे.
हेही वाचा : … म्हणून फडणवीस यांनी मानले पीएम मोदींचे आभार; पाहा, काय घडले ?
शिर्डीमध्ये साईबाबांच दर्शन करायचं असेल, नाशिकमध्ये रामकुंडला जायचं असेल त्र्यंबकेश्वर आणि पंचवटी क्षेत्राचं दर्शन करायचं असेल त्यासाठी या दोन वंदे भारत ट्रेन हे सर्व सोप करणार आहे. अशा प्रकारेच मुंबई- सोलापूर वंदे भारत ट्रेन पंढरपूरचे विठ्ठल रुख्मिनी, सोलापूरचे सिद्धेश्वर, अक्कलकोटचे स्वामी समर्थ किंवा आई तुळजाभवानीचं दर्शन तुमच्यासाठी आणखी सुलभ होणार आहे.
वंदे भारत ट्रेन सह्याद्री घाटातून जाईल तेव्हा प्रवाशांना निसर्ग सौदर्यांची अनुभूती मिळणार आहे. मी मुंबई आणि महाराष्ट्रातील लोकांना वंदे भारत ट्रेनसाठी अभिनंदन करत आहे. वंदे भारत ट्रेन आजच्या आधुनिक भारताचं सुंदर चित्र आहे. ती भारताची गती आणि दर्जा दोन्हींचं प्रतिबिंब आहे. तुम्ही पाहत आहात की, देश किती गतीने वंदे भारत ट्रेन लॉन्च करत आहे. आता पर्यंत अशा 10 ट्रेन देशात सुरू झाल्या आहेत.
आज देशातील 17 राज्यांचे 108 जिल्हे वंदे भारत एक्सप्रेसने जोडले आहेत. मला आठवतय एक काळ होता. खासदार पत्र लिहीत होते की, आमच्या स्टेशनवर ट्रेन थांबावी. पण आता देशातील खासदार भेटतात तेव्हा खासदार आमच्या भागात वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनची सुरूवात करावी.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज मुंबईला दोन वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Train) गाड्या भेट दिल्या आहेत. यात्रेकरूंसाठी या गाड्या वरदान ठरणार आहेत कारण एक वंदे भारत गाडी मुंबई ते साई धाम शिर्डी आणि दुसरी मुंबई ते सोलापूर धावणार आहे. पंतप्रधान आज मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या प्लॅटफॉर्म क्रमांक-18 वरून दोन्ही हायस्पीड ट्रेनला ग्रीन सिग्नल दिला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते.