Download App

Aaditya Thackeray : टक्केवारीचं गणित फडणवीसांकडे.., आदित्य ठाकरेंनी शिंदेंनंतर फडणवीसांनाही घेरलं

मुंबई : टक्केवारीचं गणित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnvis) अधिक माहित असल्याचं टोला युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aadity Thackeray) यांनी लगावला आहे. दरम्यान, आज आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱ्यावरुन शिंदे-फडणवीस सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

एका पत्रकाराकडून ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आल्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केलंय. ते म्हणाले, विविध विकासकामांच्या लोकार्पणावर टक्केवारीचं गणित आमच्यापेक्षा अधिक देवेंद्र फडणवीसांना माहित असल्याचं त्यांनी म्हंटलंय.

एकीकडे शिंदे-फडणवीस सरकारकडून मार्च 2022 सालची कामं अद्याप पेंडीग आहेत, अशातच आणखी कामांचं लोकार्पण आता करण्यात आलंय. मागचीच कामं पेंडीग आहेत तीच अद्याप पूर्ण तर बाकीच सुरुदेखील करण्यात आलेली नसल्याचा आरोप करण्यात आलाय.

तसेच ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या दावोस दौऱ्याबद्दल अधिक वक्तव्य केलं असून दावोसचा हा दौरा अतिशय महत्वपूर्ण होता. दावोसला जगभरातील अनेक लोकं येत असतात. तिकडे 40 कोटी रुपये खर्च करुन गेलेले मुख्यमंत्री उशिराने तिथे पोहचले असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.

दरम्यान, आम्ही ज्या विषयांत हात घालतो त्यामध्ये राजकारण नसल्याचं त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं असून दावोस प्रकरण राजकीय नाही. मी जे आरोप मुख्यमंत्र्यांवर करत आहे ते वैयक्तिक नसून राज्याचे 40 कोटी खर्च होत आहेत, म्हणून बोलत असल्याचं त्यांनी सांगितलंय.

राज्यात तरुणांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारडून प्रयत्न सुरु याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी दावोस दौरा केला आहे. त्यांनी आता लाखो तरुणांना रोजगार उपलब्ध होईल, असे प्रकल्प राज्यात येणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या या दौऱ्यावरुन ताशेरे ओढले आहेत.

Tags

follow us