Aaditya Thackeray : केंद्रात कधीही खेळ होऊ शकतो, आपलं सरकार येऊ शकतं, असा विश्वास ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी व्यक्त केलायं. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या निकालामध्ये इंडिया आघाडीच्या सर्वच पक्षांनी भाजपला टक्कर दिली असल्याचं पाहायला मिळालं. लोकसभा निवडणुकीत भाजपला 240 तर इंडिया आघाडीच्या पक्षांना 237 जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळे केंद्रात कधीही खेळ होणार असल्याची शक्यता आदित्य ठाकरे यांनी वर्तवली आहे.
महाराष्ट्रातील लहान शेतकऱ्यांना बाजारपेठेशी जोडण्याच्या योजनेचा लाभ कोणाला अन् कसा घेता येईल?
पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुकीवर केंद्र सरकारचं भवितव्य आधारित आहे. इंडिया आघाडीचे नेते पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नुकतीच मातोश्रीवर भेट दिली. यासोबत अखिलेश यादव यांच्यासारखे नेते इंडिया आघाडीत आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपला 240 तर इंडिया आघाडीचे पक्ष 237 जागांवर विजय मिळवलायं, केंद्रात कधीही खेळ होऊ शकतो, आपलं सरकार येवू शकतं, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केलायं.
पुजा खेडकर प्रकरणात आयकर विभागाची एन्ट्री : सगळ्या कुटुंबाच्या संपत्तीची होणार पडताळणी
तसेच राज्यात मागील दोन वर्षांत घटनाबाह्य सरकार आहे. संविधान संपवण्याचं पहिलं उदाहरण म्हणजे महाराष्ट्र आहे. राज्यात जेव्हा चाळीस गद्दार पळून जातात, राजीनामा न देता सत्ता स्थापन करत आहेत हे घटनाबाह्यच आहे. पुणे, मुंबई, ठाणे, कोल्हापुर, सोलापूर, मनपामध्ये कुठेही निवडणूक घेण्याची हिंमत झाली नाही. ही त्यांच्या मनात भीती आहे की, विरोधक सत्तेत येतील. संविधान बाजूला सारुन काम सुरु असून महायुती सांगतात की आम्ही जगातील सर्वातं मोठ्या पक्षासोबत आहोत. सर्वाधिक इलेक्टोरल बॉन्ड, ईडी निवडणूक यंत्रणा सगळं भाजपकडे असतानाही आपला पक्ष 9 नंबरवर असल्याचं आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं.