Download App

Aaditya Thackeray यांचा शिंदे गटावर हल्ला… आधीचे ‘ईडी’ सरकार आता झाले ‘बीसी’ सरकार!

  • Written By: Last Updated:

मुंबई : सामान्य शिवसैनिकाला गद्दार गँग घाबरत आहे. हुकूमशाही पद्धतीने भाजप-शिंदे गट आपल्याला चिरडून टाकण्याचा प्रयत्न करत आहे. महाराष्ट्राला दिल्लीसमोर झुकवण्याचा प्रयत्न ते करत आहेत. मात्र, हा महाराष्ट्र दिल्लीसमोर कदापी झुकणार नाही. आज देखील आपल्या वरळीतील निर्धार मेळाव्याची धास्ती मिंधे गटाला पडली. म्हणूनच त्यांनी महापालिकेच्या लोकांना पाठवून आपल्या कार्यक्रमांची पोस्टर, स्टेज हटवण्याचा प्रयत्न केला. पण डर अच्छा होता, असेच म्हणावे लागेल. त्यामुळे मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो हे अलिबाबाचे सरकार लवकरच कोसाळणार आहे. ‘ईडी’ सरकार हे बिल्डर आणि कॉन्टॅक्टर म्हणजे ‘बीसी’ सरकार झाले आहे, असा टोला युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि ४० आमदारांना लगावला.

निर्धार मेळाव्याप्रसंगी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मिंधे गटातील आमदारांवर तुफान हल्ला चढवला. याप्रसंगी व्यासपीठावर आमदार भास्कर जाधव, सचिन आहिर, सुषमा अंधारे उपस्थित होते.

Bharat Gogawale शिवसेनेकडून ठाकरे गटाच्या आमदारांना ‘व्हिप’… कारवाई दोन आठवड्यानंतर करण्याचा इशारा!

आदित्य ठाकरे म्हणाले की, आपल्या सभेत कोणी झारखंड मधून आलेले नाही ना. कारण आपल्याला त्याची गरजच नाही. इथे उपस्थित प्रत्येक जण हा हाडामासाचा शिवसैनिक आहे. जांभोरी मैदानाची सत्ताधाऱ्यांनी वाट लावली आहे. आपण केलेल्या चांगल्या कामाची भाजप-शिंदे गटाने जाणीवपूर्वक बदनामी केली. फ्लेक्स, कटआऊट लावून वरळी विद्रुप करण्याचं काम मिंधे गट करत आहे.

भाजपकडून केवळ मिंधे गटाचा वापर केला जात आहे. त्यामुळे हे सरकार फार काळ टिकणार नाही. आता ते दिल्लीत काही तासांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेले होते. ते कशासाठी तर आता आम्हाला ठाकरे मिळेल, याची विचारणा करायला गेले होते, असा मिस्किल टोला लगावत आदित्य ठाकरे म्हणाले की, भाजपकडून मिंधे गटाचा वापर झाला की या ४० गद्दारांना भाजप फेकून देईल, हे त्रिवार सत्य आहे.

Tags

follow us