Download App

 Union Budget 2023 : ‘जखमेवर मीठ चोळणारा अर्थसंकल्प, आदित्य ठाकरेंची घणाघाती टीका 

मुंबई : लोकसभा निवडणुकीत शेवटचा पूर्णवेळ अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी संसदेत सादर केला. यात गरिबांना आणि मध्यमवर्गाला दिलासा मिळण्यासाठी करसवलतीची मर्यादा ५ लाखांवरून ७ लाख करण्यात आली. शिवाय काही गोष्टी महाग करण्यात आल्या तर काही गोष्टी स्वस्त झाल्या आहेत. विरोधकांकडून यावर टीका केली जात आहे. शिवसेनेकडूनही या अर्थसंकल्पावर नाराजी व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रात अर्थसंकल्पातून काय मिळाले, असा सवाल युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी केली.

गुजरात विधानसभेच्या निवडणुका झाल्या. १५० हून जास्त जागा त्यांनी जिंकले आहेत. ज्या राज्यात वेदांता फॉक्सकॉन, टाटा एअरबस, गीफ्ट सिटी, फायनान्शिअल सेंटर येथे गेले. एवढंच नव्हे तर अधिकच्या सवलती देखील देण्यात आल्या. सूरतला डायमंड हब मिळाले आहे. पण ज्या महाराष्ट्रातून ज्या राज्यात उद्योग नेले, त्या] महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम या सरकारने केले.

कर्नाटकात आता विधानसभेत निवडणुकात आहेत. यामध्ये जनमत चाचणी अंदाजातून अपेक्षित जागा येणार, असे त्यांना दिसत नाही. तिथे खर्च दाखवलेला जातोय. परंतु, राष्ट्रीय बजेटात महाराष्ट्राचा उल्लेख कुठेही दिसला नाही. मुंबईचा उल्लेख कुठे दिसला नाही. मुद्दा असा आहे की, घटनाबाह्य पद्धतीने ओढा- ताण करत सरकार बनवलं आहे. तरी मुंबईला दिल्लीसमोर झुकवायचे आणि काहीच द्यायचे नाही, हे या बजेटमधून दिसले, अशी जोरदार टीका आदित्य ठाकरे यांनी केली. कर्नाटकासाठी अप्पर भद्रा रिजनमध्ये काम करणार असल्याचे सांगितले. परंतु, वर्षानुवर्षे हे सरकार आहे. तरीदेखील आता तिथे देण्याची गरज काय, निवडणुका येत आहेत, म्हणून दिले जात आहे का ? दुसऱ्या कोणत्याही राज्यांचा उल्लेख नाही. परंतु महाराष्ट्राला काहीच मिळाले नाही, अशा  शब्दांत आदित्य ठाकरेंनी जोरदार हल्लाबोल केला.

Tags

follow us