औरंगाबाद : माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांना वरळीतून विधानसभा निवडणूक लढवण्याचं चॅलेंज दिलं होतं. त्यानंतर त्यांनी शिंदे यांना ठाण्यातून देखील निवडणूक लढवण्याचं चॅलेंज दिलं आहे. पण आदित्य ठाकरे यांची ही दोन्ही चॅलेंज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीकारली नाही, त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नवं चॅलेंज दिलंय.
राज्याच्या अधिवेशनापूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांना राज्यपाल पदावरून हटवून दाखवा, असा नवा चॅलेंज आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना दिल. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे हे आदित्य ठाकरे यांचं हे नवं चॅलेंज तरी स्वीकारतात का ? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
वरळीतून लढून दाखवण्याचं मी काल सुद्धा मुख्यमंत्र्यांना चॅलेंज दिलं आहे. वरळीतून नसेल तर ठाण्यातून तरी लढून दाखवा, असं देखील मी त्यांना चॅलेंज केलं होत. मी त्यांना आणखी एक चॅलेंज देतो. त्यांची माझ्या विरोधात लढण्याची हिंमत किंवा ताकद नसेल तर येत्या अधिवेशनात राज्यपालांचं भाषण होण्याऐवजी महाराष्ट्र द्वेष्ट्या राज्यपालांना बदलून दाखवावं, असं नवं चॅलेंज आदित्य ठाकरे यांनी राज्यपालांना दिलं.
राज्यपालांना जायचं आहे. त्यांनी तसं पंतप्रधानांना कळवलं आहे. तरीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावर काही बोलत नाहीत. हे चित्रं महाराष्ट्रासाठी घातक आहे, अशी जोरदार टीका त्यांनी केली. तसेच मुख्यमंत्री शिंदे माझ्याविरोधात वॉर्डातून लढण्यास तयार असतील तर मी वॉर्डातून लढण्यास तयार आहे, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.