Abdul Sattar : जलील हे राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडवत आहेत, सत्तारांची जलील यांच्यावर टीका

औरंगाबादचे नामांतर आता छत्रपतसी संंभाजीनगर ( Chhatrapati Sambhajinagar ) असे झाले आहे. यावरुन संभाजीनगरचे एमआयएमचे ( MIM ) खासदार इम्तियाज जलील ( Imtiyaz Jaleel ) यांनी या निर्णयाला विरोध दर्शला आहे. या निर्णयाच्या विरोधात त्यांनी आजपासून साखळी उपोषण सुरु केले आहे. या आंदोलनाच्या वेळी औरंगजेबाचे फोटो लावण्यात आले आहे. यावरुन वातावरण चिघळण्याची शक्यता आहे. त्यामुळे […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 03 04T180411.207

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out 2023 03 04T180411.207

औरंगाबादचे नामांतर आता छत्रपतसी संंभाजीनगर ( Chhatrapati Sambhajinagar ) असे झाले आहे. यावरुन संभाजीनगरचे एमआयएमचे ( MIM ) खासदार इम्तियाज जलील ( Imtiyaz Jaleel ) यांनी या निर्णयाला विरोध दर्शला आहे. या निर्णयाच्या विरोधात त्यांनी आजपासून साखळी उपोषण सुरु केले आहे. या आंदोलनाच्या वेळी औरंगजेबाचे फोटो लावण्यात आले आहे. यावरुन वातावरण चिघळण्याची शक्यता आहे. त्यामुळे संभाजीनगर जिल्ह्यातील मंत्री अब्दुल सत्तार यांनी जलील यांनी वातवरण बिघडू नये असे ते म्हणाले आहेत. यावेळी कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे अमरावती येथे बोलत होते.

संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांनी नामांतर विरोधाच्या आंदोलनात औरंगजेबाचा फोटो लावल्याने वाद झाला आहे. त्यामुळे  महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी खासदार इम्तियाज जलील यांच्यासह सर्वांनी दक्षता घ्यावी, असे सत्तार म्हणाले आहेत. हा जो नामांतराचा निर्णय घेतला आहे तो सरकारने घेतलेला आहे. वैयक्तिक कोणीही घेतलेला नाही, असे त्यांनी सांगितली.

Ram Satpute On Jitendra Awhad : ‘मुंब्र्याच्या बाहेर पडल्यास हिंदू समाज कळेल’, सातपुते व आव्हाडांमध्ये रंगले ट्विटर वॉर

या निर्णयाची अंमलबजावणी करताना खासदार इम्तियाज जलील यांनी आंदोलन करताना भावना जरूर जपायला पाहिजे. तसेच महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही, याची काळजी त्यांनी घेतली पाहिजे. अशा प्रकारे आंदोलन करुन जलील हे कायदा व सुव्यवस्था बिघडवत आहेत, अशी टीका सत्तारंनी जलील यांच्यावर केली आहे.

दरम्यान औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर नाव व्हावे ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. या मागणीसाठी शिवसेना व भारतीय जनता पक्ष यांचा आग्रह होता. उद्धव ठाकरे यांचे जाताना त्यानी हा निर्णय घेतला होता. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यावर त्यांनी पुन्हा हा निर्णय घेतला. या निर्णयाला केंद्र सरकारची मान्यता मिळाली असून आता ग्रामीण स्तरावर देखील जिल्ह्याचे नाव बदलले आहे.

Exit mobile version