Download App

आमचा ‘आँख मिचौली’शी काही संबंध नाही; अजिदादांच्या प्रश्नावर सत्तारांचे मिश्किल उत्तर

 Abdul Sattar On Ajit Pawar :  गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये अनेक राजकीय चर्चा रंगवल्या जात आहेत. विरोधी पक्ष नेते अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याची देखील चर्चा चालू होती. यावर नंतर त्यांनी मी राष्ट्रवादीतच राहणार असे उत्तर दिले आहे. तरी देखील या चर्चा थांबायचे नाव घेत नाही. यावरुन आता राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी एक मिश्किल विधान केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून अजित पवार व भाजप यांच्यामध्ये जी आख मे चोली चालू आहे, त्यावर तुमचं मत काय असा प्रश्न  सत्तारांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना सत्तार म्हणाले की, तुमची जी कॅमेरामध्ये आँख मिचौली सुरु आहे ती वेगळी आहे. आमच्या सरकारला त्या आँख मिचौलीशी काहीही संबंध नाही. आमच्या सरकारवर याचा कोणताही परिणाम होणार नाही, अशा मिश्किल शब्दात सत्तारांनी उत्तर दिले आहे.

भावी मुख्यमंत्री ! सासरवाडीत झळकले अजित पवारांचे बॅनर

तसेच एकनाथ शिंदेंवर आमचा पूर्ण विश्वास आहे. आमचे 40 आमदार व लाखो कार्यकर्त्यांचा विश्वास एकनाथ शिंदेंवर आहे. ते जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, असे सत्तार म्हणाले आहेत. दरम्यान, विरोधी पक्षनेते अजित पवार हे आज आपल्या बारामती मतदारसंघात होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी बोलताना त्यांच्याविषयीच्या चर्चांविषयी देखील भाष्य केले आहे.

तेलही गेलंय, तुपही गेलंय अन् दुपट्टा आलायं, नरेश म्हस्केंची थेट ठाकरेंवर खरमरीत टीका

विनाकरण माझ्याविषयी नॉटरिचेबल असल्याच्या चर्चा सुरु असतात. माझे कार्यक्रम रद्द झाले तरी चर्चा होतात किंवा मी नियोजित कार्यक्रमाला असलो तरी चर्चा होतात. मी शेवटपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातचं राहणार, असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Tags

follow us