अभिजीत दिपकेला पोलिसांनी कुठे नेलं? आंदोलनाची धुरा मिळताच अजिंक्य शिंदेनं केला खुलासा!

Ajinkya Shinde : अभिजीत दिपकेला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर अजिंक्य शिंदेने आंदोलनाची जबाबदारी स्वीकारत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा दिला.

Abhijeet Dipke Detained by Delhi Police Ajinkya Shinde Reaction

Abhijeet Dipke Detained by Delhi Police Ajinkya Shinde Reaction

Abhijeet Dipke Detained by Delhi Police Ajinkya Shinde Reaction: केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत जंतरमंतर येथे कॉक्रोच जनता पार्टीने (CJP) आज ( 10 ऑक्टोबर) आंदोलन करण्याची तयारी केली होती. मात्र दिल्लीत आंदोलनासाठी जाणाऱ्या सीजेपी संस्थापक अभिजीत दिपके (Abhijeet Dipake) व त्याचे सहकारी आशुतोष रांका (Ashutosh Ranka) आणि सौरव दास (Saurav Das) यांना दिल्ली पोलिसांनी विमानातळावर विमानात शिरुन ताब्यात घेतले. त्यामुळे पुढे आंदोलनाचं काय होणार हा प्रश्न पडला असताना अभिजीत दिपकेनी आंदोलनाची जबाबदारी अजिंक्य शिंदे (Ajinkya Shinde) याच्यावर टाकली. तेव्हापासून अजिंक्य शिंदे माध्यमांना सामोरे जात आहेत.

Imran Khan : मोठी बातमी, अभिनेता इम्रान खान मुंबई पोलिसांच्या ताब्यात

दिल्लीत अभिजीत दिपकेंना ताब्यात घेतलं. दिल्लीत प्रत्येक आंदोलकाला पोलिस ताब्यात घेत आहे. देशातील हुकूमशाही सरकार घाबरलंय. दिल्लीत हवा आणि पाणी सोडलं तर सरकारने सगळं बंद केलं आहे. यातच अर्धे आंदोलन आम्ही जिंकलो आहोत. सरकारला वाटलं सीजेपीच्या तिघांना ताब्यात घेतल्यावर हे आंदोलन संपेल. पण असं होणार नाही. आता हे आंदोलन ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यानंतरच संपेल. असा इशारा अजिंक्य शिंदेने दिला आहे. आजच अभिजीत दिपकेंच्या आजीचे निधन झाले आहे. पण अजूनही पोलिसांनी अभिजीतला त्याच्या घरच्यांशी बोलू दिलं जात नाही. अजूनही आम्हाला हे माहित नाही की, अभिजीत दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांना पोलिसांनी कुठे बंदीस्त करुन ठेवलंय. आम्हाला त्यांची चिंता वाटत आहे. एका ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी दिल्लीत एमरजेन्सी लावली, असेही अजिंक्य म्हणाला.

‘राहुल गांधींची नापास झालेल्या विद्यार्थ्यांसारखी अवस्था’;कंगना रणौतचा राहुल गांधींना टोला! नेमकं काय घडलं?

अजिंक्य शिंदे यांनी केलेल्या आरोपांनुसार, अभिजीत दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांना पोलिसांनी नेमके कुठे ठेवले आहे, याची माहिती अद्याप मिळालेली नाही. दिपके यांच्या आजीचे निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांनाही चिंता लागली आहे. दरम्यान, सीजेपीचे संस्थापक ताब्यात असले तरी आंदोलन थांबणार नसल्याची भूमिका अजिंक्य शिंदे यांनी घेतली आहे. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

Exit mobile version