मुंबई : एका वाहिनीने आदित्य ठाकरेंची राजकीय नाही तर वैयक्तिक मुलाखत घेतली. त्यावेळी विविध विषयांवर आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी मुलाखतीची सुरूवातीलाच आदित्यंना त्यांच्या खाण्याबाबतच्या आवडी-निवडींबद्दल विचारण्यात आलं. यावर आदित्य ठाकरेंनी अगदी मुक्तपणे आपली खवय्येगिरी सांगितली आहे.
Maharashtra Politics : आता ‘हे’ असणार शिवसेनेचं मध्यवर्ती कार्यालय, पक्षाच्या पत्रकात दिला पत्ता
आदित्य यांनी सांगितले की, त्यांना महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृतीतील वरण-भात, स्ट्रीट फूड पैकी असलेल्या भजे पाव त्याचबरोबर मॅगी असो, पास्ता असो वा थायकरीपर्यंत मला सगळ काही आवडतं. या मुलाखतीचं ठिकाण निश्चित करण्यासाठी देखील त्यांनी अनेक रेस्टॉरंट्सचे पर्याय सूचवले होते. ते यावर अगदी मिश्किलपणे म्हणतात की, माझ्या आवडीच्या पदार्थांची यादी मोठी आहे. पण मी चिमणी प्रमाणे थोडं-थोडं खातो.
त्याचबरोबर मी जेव्हा वेगवेगळे देश, राज्य, जिल्ह्यांमध्ये प्रवास करतो तेव्हा तेथील स्थानिक पदार्थ खाण्याला प्राधान्य देतो. कारण महाराष्ट्रात सर्वत्र रस्त्यांच्या बाजूला देखील चांगले पदार्थ मिळतात. यामध्ये मी साताऱ्यात प्रवास करताना ‘तंदूरी चाय’ हा चहाचा प्रकार पाहिला. मला हे विशेष वाटलं. माझ्या ट्रेनरने मला विना साखर आणि दूधाचा चहा घ्यायाला सांगितला होता. पण आठ महिन्यांनंतर मी साखर आणि दूध घातलेला चहा घेतलाच. मी त्यांना मेसेज करून सांगितलं की, मी चहा घेतला. मी नाही कंट्रोल करू शकलो.
