Download App

सूरज चव्हाण यांच्यावर घरावर ईडीचा छापा, आदित्य ठाकरे म्हणाले…

  • Written By: Last Updated:

Aditya Thackeray : काल ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे निकटवर्तीय समजले जाणारे उबाठाचे पदाधिकारी सचिव सूरज चव्हाण(Suraj Chavan), तसेच संजय राऊत (Sanjay Raut) यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्या घरावर ईडीने छापे टाकले. कोरोनाच्या काळात लाईफलाइन कंपनी घोटाळ्याप्रकरणी सूरज चव्हाण यांच्या चेंबूर येथील घरावर छापा टाकण्यात आला होता. दरम्यान, यावर आता आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. जे हाडामासाचे शिवसैनिक आहेत ते अशा कारवायांना घाबरत नाही, असं ते म्हणाले. (Aditya Thackeray’s reaction to Suraj Chavan’s house being raided by ED)

आज प्रसारमाध्यमांशी सवाद साधतांना आदित्य ठाकरे म्हणाले, जे हाडामासाचे शिवसैनिक आहेत ते अशा कारवायांना घाबरत नाही. मी सूरज चव्हाण यांच्या घरी गेलो. त्यांच्याशी बोललो. त्यांना विनाकारण त्रास दिला जात असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले.

अमेरिकेत PM मोदींच्या भाषणावर महिला खासदारांनी बहिष्कार का टाकला? कोण आहेत ‘या’ महिला खासदार? 

मुंबई महानगरापालिकेतील ठेवी संदर्भात शिंदे-फडणवीस सरकारला जाब विचारण्यासाठी ठाकरे गटाकडून १ जुलै रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. याविषयी पत्रकारांनी विचारले असता, ते म्हणाले, मुंबई महानगर पालिकेत गेल्या एक वर्षात खोके सरकारचा कारभार सुरु आहे. गेल्या एक वर्षात घोटाळे समोर आले आहेत. स्ट्रीट फर्निचर घोटाळा आहे, लाईटचा घोटाळा आहे. घोटाळा लोकांसमोर येणं गरजेचं तो आम्ही आणणार. या घोटाळ्यांच्या विरोधात आमचा 1 जुलैला मोर्चा आहे. यावेळी दिल्लीश्वराच्या सांगण्यावरून मुंबईकरांचा पैसा लुटला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

ठाकरे गटाच्या वांद्रे येथील 40 वर्षे जुन्या शिवसेनेच्या शाखेवर बीएमसीने बुलडोझर चालवला आहे. यावर बोलतांना आदित्य ठाकरे म्हणाले, जे काही राजकीय हेतुने आणि चिंदीपणाने कारवाया होत आहेत, हे आता देशासमोरच नाही तर जगासमोर आलं आहे. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा चालवतो. बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो असताना त्यांनी तो देखील हटवला. हे गद्दारांना पटणार आहे का? जे काही झालं त्या सगळ्या गोष्टी शिवसैनिक लक्षात ठेवेल आणि योग्यवेळेस उत्तर दिले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

मातोश्रीची सुरक्षेत कपात केल्याच्या वृत्तानंतर गृहमंत्रालयाने सुरक्षा कमी केली नाही असं सांगितलं. याविषयी आदित्य ठाकरेंना विचारले असता ते म्हणाले, तुम्ही स्वतः जाऊन बघा… मातोश्रीची सुरक्षा कमी केली. यावर मी बोलणं योग्य नाही.

Tags

follow us