गृहविभाग कोणाच्या दबावाखाली चालतो? आदित्य ठाकरेंचे शिंदे-फडणवीसांवर ताशेरे

ठाणे : ठाण्यातील ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांच्यावर सोमवारी शिंदे गटाकडून हल्ला झाल्याचा आरोप करण्यात आला होता. रोशनी शिंदे या गर्भवती आहेत. त्यांच्यावर आता खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ठाण्यातील घोडबंदर रोड परिसरातील कासारवडवली भागात त्यांचं कार्यालय आहे. तेथुन घरी जात आसताना हा हल्ला झाल्याच सांगण्यात आलं आहे. यावर वैद्यकीय अहवाल आल्यानंतर पुछील तपास […]

Aditya Thackeray

Aditya Thackeray

ठाणे : ठाण्यातील ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांच्यावर सोमवारी शिंदे गटाकडून हल्ला झाल्याचा आरोप करण्यात आला होता. रोशनी शिंदे या गर्भवती आहेत. त्यांच्यावर आता खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

ठाण्यातील घोडबंदर रोड परिसरातील कासारवडवली भागात त्यांचं कार्यालय आहे. तेथुन घरी जात आसताना हा हल्ला झाल्याच सांगण्यात आलं आहे. यावर वैद्यकीय अहवाल आल्यानंतर पुछील तपास सुरू करणार असल्याचं पोलीसांनी सांगितलं.

या प्रकरणामुळे ठाण्यातील राजकारण चांगलचं तापलं आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील आनंद आश्रमात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली त्यानंतर आज यावेळी उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी भेट घेणार आहेत. यावेळी आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली.

आदित्य ठाकरे म्हणाले, ‘राज्यात कोणत्याही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांवर अशा प्रकारे हल्ले होत आहेत पण त्यावर कोणतीही कारवाई होत नाही. भाजपच्याच त्यामुळे कार्यकर्त्यांवर अशा प्रकारे हल्ले होत असल्याने गृहखात कुठून चाललय असा प्रश्न पडत आहे?

पोलिसांवर कोणाचा दबाव आहे. स्वतःच्या लोकांना गृहमंत्री वाचवू शकत नसतील तर नागरिकांनी काय करायचं? गृहविभाग कोणाच्या दबावाखाली चालतो? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीवर उपस्थित केला आहे.

Exit mobile version