Adv Aseem Sarode On Indrajit Sawant Threat Call : छावा चित्रपटावरून (Chhaava) आरोप प्रत्यारोप होत आहेत. दरम्यान इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना डॉ. प्रशांत कोरटकर यांच्या नावाने धमकीचा फोन आला. सावंतांना शिविगाळ करण्यात आली होती. घरात घुसून मारण्याची धमकी दिली गेलीय. समाज माध्यमातून हे कॉल रेकॉर्डिंग सध्या व्हायरल होतंय. माझी बदनामी केल्याप्रकरणी मी सावंतावर अब्रुनुकसानीचा दावा करणार, असं म्हणालेत. एआय, तंत्रज्ञानाचा वापर करून माझ्या आवाजाचा वापर करत कोणीतरी हा खोडसाळपणा केलाय. परंतु सावंतांनी याची शहानिशा करणं, गरजेचं होतं असं कोरटकर म्हणालेत. यावर आता कायदेतज्ज्ञ असीम सरोदे (Aseem Sarode) यांची प्रतिक्रिया समोर आलीय.
असीम सरोदे म्हणाले की, आत्ताच इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांच्याशी बोलणं झालंय. त्यांच्या मोबाईलवर प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल अत्यंत उद्धट आणि बदनामीकारक वक्तव्य करणारा फोन आला होता, तो इंद्रजित सावंत यांचा मोबाईल पोलीस तपासासाठी जप्त करणार आहेत. पोलिसांनी इंद्रजित सावंत यांचा मोबाईल फोन जरूर ताब्यात घ्यावा. पण केवळ प्रशांत कोरटकर अन् इंद्रजित सावंत यांच्यात झालेले कॉल रेकॉर्डेड बोलणे याबाबत शहनिशा करावी.
राहुल गांधींची अवस्था वाघ नव्हे माजंरासारखी, प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल
सावंत यांच्या मोबाईलवरील इतरही माहिती पोलिसांनी बघावी. कारण त्यात काहीही बेकायदेशीर नसल्याने तसा फरक पडत नाही. पण इंद्रजित सावंत यांचे त्या मोबाईल मधील इतर व्यक्तिगत कौटुंबिक फोटो, संवाद पोलिसांकडून लीक होणार नाही, याची जबादारी पोलिसांची आहे. इंद्रजित सावंत यांच्या खाजगी जीवन जगण्याच्या हक्कांचे (राईट टु प्रायव्हसी) चे उल्लंघन होऊ नये, याची जबादारी पोलिसांवर आहे. त्यात पोलिसांनी कसूर केली आणि इंद्रजित सावंत यांच्या राईट टू प्रायव्हसीचे उल्लंघन झाल्यास आम्ही त्यांच्यातर्फे कायदेशीर मार्ग वापरू. प्रशांत कोरटकर यांचे सगळे मोबाईल पोलिसांनी जप्त केलेत का? हे सुद्धा पोलिसांनी सांगावे.
मढीचा ‘तो’ वादग्रस्त निर्णय, देवस्थानाची होळी पेटवण्यासाठी मंत्री राणे येणार…
तसेच इंद्रजित सावंत यांनी कोरटकर यांच्या आवाजाची शहनिशा न करता नागपूरच्या प्रशांत कोरटकर यांच्यावर आरोप केला, असा दावा करून हे प्रशांत कोरटकर इंद्रजित सावंत यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा करणार असे जाहीरपणे म्हणाले आहेत. हे बघायला महाराष्ट्र उत्सुक आहे की, कशाच्या आधारे प्रशांत कोरटकर इंद्रजित सावंत यांच्यावर अब्रुनुकसानीची केस करतात? आणि इंद्रजित सावंत यांच्यावर कोणतीही केस दाखल झाल्यास मी त्यांना सगळी कायदेशीर मदत करणार आहे. माझ्यासोबत महाराष्ट्रातील अनेक वकील इंद्रजित सावंत यांच्याबरोबर आहेत, असं अॅड. असीम सरोदे म्हणाले आहेत.