Download App

Shinde VS Fadanvis : शिंदे- फडणवीस एकाच मंचावर; जाहिरात वादानंतरची नाराजी समोर येणार?

Shinde VS Fadanvis : राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे या शिवसेनेकडून मंगळवारी वर्तमानपत्रात देण्यात आलेल्या जाहिरातीवरून सुरू झालेला वाद अजूनही थांबलेला नाही. शिंदे सेनेने डॅमेज कंट्रोल करत आज देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा फोटो असलेली दुसरी जाहिरात दिली. तरी देखील विरोधकांनी मुख्यमंत्री शिंदेंना (Eknath Shinde) टार्गेट करणे सोडलेले नाही. देवेंद्र फडणवीस यांना सॉफ्ट कॉर्नर देत शिंदेंवर टीका केली तर दुसरीकडे भाजप कर्यकर्ते आणि नेते यांच्याकडून शिंदेंवर हल्लाबोल सुरू ठेवला आहे. त्यानंतर आज शिंदे- फडणवीस एकाच मंचावर दिसणार आहेत. त्यामुळे शिंदेंच्या जाहिरातीवर नाराज असल्याच्या चर्चांनंतर फडणवीस काय बोलणार? यावर सर्वांचे लक्ष लागले आहे. ( After Advertisemenyt issue Shinde-Fadanvis on stage what will talk unwilling Fadanvis )

Robinhood Army For Varkari : रॉबिनहूड आर्मी वारकऱ्यांच्या सेवेसाठी दाखल…

शासण आपल्या दारी या योजनेसंदर्भात आज शिंदे- फडणवीस एकाच मंचावर दिसणार आहेत. आज संध्याकाळी पालघरमध्ये मोठा कार्याक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाषण होणार आहे. दरम्यान राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे या शिवसेनेकडून मंगळवारी वर्तमानपत्रात देण्यात आलेल्या जाहिरातीवर देवेंद्र फडणवीसांनी अद्याप मौन बाळगलं आहे. त्यामुळे यावर आता फडणवीस काय बोलणार? यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.

Ravikant Tupkar : आठ दिवसांत मागण्या मान्य करा अन्यथा… आंदोलन मागे घेत तुपकरांनी दिला इशारा

काय आहे ही जाहिरात?

शिवसेनेच्या एका सर्व्हेनुसार राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच महाराष्ट्रात अव्वलस्थान मिळाल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला. यासंदर्भातील जाहिरात सर्वच वृत्तपत्रांच्या पहिल्याच पानावर प्रकाशित करण्यात आल्या.’देशात मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ या मथळ्याखाली सर्वेक्षणाची जाहिरात प्रकाशित करण्यात आली. जाहिरातीमधून राज्यात देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदे यांच्यात एकनाथ शिंदेंच अव्वल असल्याचं दर्शवण्यात आलं. दरम्यान, शिवसेनेने प्रकाशित केलेल्या या जाहिरातीमुळे शिवसेनेने एक प्रकारे देवेंद्र फडणवीसांना त्यांची जागा दाखवून डिवचण्यात आलं.

शिंदेंनी काय स्पष्टीकरण दिलं?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा फोटो असेल, नसेल पण आम्ही दोघेही लोकांच्या मनात आहेत, हे सगळ्यात महत्वाचे आहे. शिवसेना-भाजप ही बाळासाहेबांच्या विचारांची आहे. स्वार्थासाठी, खुर्चीसाठी, सत्तेसाठी आणि मला काही मिळेल यासाठी युती झालेली नाही. म्हणून ही युती भक्कम आहे. शिवसेना-भाजप महायुती येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विकासाच्या मुद्द्यांवर जिंकेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Tags

follow us