मुंबई : शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीचा वादाच्या भोवऱ्यात सापडतात. आता पुन्हा एकदा त्यांनी असंच एक वक्तव्य केलं आहे. यावेळी त्यांनी राज्यात गेले काही दिवस राज्यात शासकीय कर्मचाऱ्यांचा जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्यात यावी या मागणीसाठी संप सुरू होता. सोमवारी हा संप मागे घेण्यात आला. पण याच शासकीय कर्मचाऱ्यांबाबत शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होत. त्यानंत त्यांची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.
संजय गायकवाड म्हणाले होते की, ’95 टक्के सरकारी कर्मचाऱ्यांकडे हरामाची कमाई आहे.’ त्यांच्या याच वक्तव्याबद्दल जाब विचारणाऱ्या अधिकाऱ्याला त्यांनी शिवीगाळ केल्याचं या ऑडिओ क्लिपमध्ये समोर आल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच त्यांच्या सरकारी कर्मचाऱ्यांबद्दलच्या त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर आमदार संजय गायकवाड ठाम असल्याचं देखील या क्लिपमध्ये समजत आहे.
यावर विरोधी पक्षनेते अजित पवार विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान सभागृहात बोलतना संतापले ते म्हणाले की, ‘सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी पण समंजस भूमिका दाखवली पाहिजे. सत्ताधारी पक्षाचे लोक काय बोततात हे सातत्याने लक्षात आणून देतो. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड हे म्हणाले की, ’95 टक्के सरकारी कर्मचाऱ्यांकडे हरामाची कमाई आहे.’ असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं. त्यावर अजित पवार यांनी सवाल उपस्थित केला आहे.
Ajit Pawar : शेतकरी आडवा झालाय, पंचनामे तरी करा…
पुढे अजित पवार असं देखील म्हणाले की, राज्यातील सरकारी कर्मचारी पुन्हा नाराज झाले तर शेतकऱ्यांची अनेक कामे खोळंबली आहेत. संपामुळे काम विस्कळीत झाले आहेत. दरम्यान शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीचा वादाच्या भोवऱ्यात सापडतात.