Download App

Ajit Pawar : मतांसाठी भाजपने आजारी आमदारांना रुग्णवाहिकेतून आणले… तर फडणवीसांचेही सडेतोड उत्तर!

  • Written By: Last Updated:

पिंपरी : स्वतःच्या स्वार्थासाठी भाजपने आजारी आमदारांना मतदान करण्यासाठी रुग्णवाहिकेतून नेले. त्यामुळे आमदारांच्या आजारपणापेक्षा भाजपला मतं महत्वाची होती. आजारपणातही लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap), मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांना रुग्णावाहिकेतून मतदानासाठी आणले. मात्र, तिकीट वाटपावेळी यांना टिळकांचे कुटुंब (Tilak Family) दिसले नाही, अशी भाजपवर (BJP) सडकून टीका राज्याचे विरोधी पक्षनेता अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे.

चिंचवड पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या प्रचार सभेत अजित पवार बोलत होते. अजित पवार म्हणाले की, आता कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपला त्यांची जागा दाखवून द्यायची चांगली संधी आली आहे. राहुल कलाटे यांना मी बऱ्याच वेळ समजून सांगितले. पण ऐकलं नाही. ठिक आहे. चिंचवडची जनता त्यांना जागा दाखवून देईल. शिवसेनेची सर्व मतं ही नाना काटे यांनाच पडणार आहे. तर राहुल कलाटे केवळ ५०० मते पडणार आहे. तसेच खरी शिवसेना कोणाची आहे हे देखील समजणार आहे.

नेते आजारी असताना भाजपने मतदान करण्यासाठी आणले, अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी वक्तव्य केले. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. अजित पवारांना काय प्रॉब्लेम आहे. आमच्याकडे असे आमचे नेते आहेत की जे पक्षाकरिता स्वतःचा जीव दावावर लावून त्या ठिकाणी मतदान करायला येतात. त्यांचा आम्हाला गौरव आहे. त्यांच्या पक्षासारखे केवळ स्वार्थी नेते आमच्याकडे नाहीत, असा टोला फडणवीसांनी लगावला आहे.

follow us