Ajit Pawar Gives hint about Dhananjay Munde came back after his Demand : एका कार्यक्रमामध्ये बोलताना माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी अजित पवारांकडे आपल्या हाताला काम म्हणजे जबाबदारी देण्याची मागणी केली. त्यावर अजित पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत धनंजय मुंडे यांचं पुनर्वसन करण्याचे संकेत दिले आहेत.
रायगड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील हजेरी लावली होती. यावेळी बोलताना मुंडे यांनी सुनील तटकरेंशी संवाद साधत अजित पवार यांना आपल्याला जबाबदारी दिली जावी अशी मागणी केली.
काय म्हणाले अजित पवार?
दरम्यान मुंडेंनी जबाबदारी देण्याची मागणी केल्यानंतर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, मुंडेंच्या विनंतीला मान दिला जाईल. त्यांच्या मागणीचा विचार केला जाईल. असं म्हणत अजित पवार यांनी एक प्रकारे धनंजय मुंडे यांचं पुनर्वसन करण्याचे संकेतच दिले आहेत. दरम्यान धनंजय मुंडे यांना बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात निकटवर्तीय वाल्मीक कराडवर आरोप झाल्यानंतर पदावरून पायउतार व्हावं लागलं होतं.
काय म्हणाले धनंजय मुंडे?
रायगड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील हजेरी लावली होती. यावेळी बोलताना मुंडे म्हणाले की, सुनील तटकरेंनी आम्हाला मार्गदर्शन करत राहावं. चुकले तर कान धरावा. नाही चुकलं तर चालतं का? पण आता रिकामं ठेवू नका. काही तरी जबाबदारी द्या. अशी मागणी मुंडे यांनी केली होती.