Download App

‘अजित पवार गटाचा चाचणीपासून पळ काढण्याचा प्रयत्न’; शरद पवार गटाचा आरोप

Image Credit: Letsupp

Ncp Crisis : राष्ट्रवादीत उभी फुट पडल्यानंतर मागील चार महिन्यांपासून राष्ट्रवादी पक्ष कोणाचा या मुद्द्यावरुन सुनावणी सुरु होती. अखेर आज दोन्ही गटांचा युक्तिवाद संपल्यानंतर आता निकाल हाती येणार आहे. आजच्या सुनावणीनंतर शरद पवार गटाने (Sharad Pawar Group) गंभीर आरोप केला आहे. सुनावणीदरम्यान संघटनात्मक चाचणीपासून अजित पवार गट (Ajit Pawar Group) पळ काढण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भातील पोस्ट राष्ट्रवादीने एक्सवर शेअर केली आहे.

पोस्टमध्ये म्हटले, “अजित पवार गटाकडून संघटनात्मक चाचणीपासून पळ काढण्याचा प्रयत्न सुनावणीदरम्यान झाला. निवडणूक आयोगासमोर चिन्ह आणि पक्ष कोणाचा यासंदर्भात सुनावणी झाली. आता निकालाची प्रतिक्षा आहे. अजित पवार गटाकडून संघटनात्मक चाचणीपासून पळ काढण्याचा प्रयत्न सुनावणीदरम्यान झाला. याचा अर्थ असा होतो की, महाराष्ट्र असो किंवा संपूर्ण भारत अजित पवार गटाकडे संघटनात्मक पातळीवर पदाधिकाऱ्यांची संख्या कमीच आहे” अशी पोस्ट शरद पवार गटाकडून करण्यात आली आहे.

ऐन थंडीत राजकारण तापलं! ‘महुआवर अन्याय अन् लोकशाहीची हत्याच’; ममता बॅनर्जी भडकल्या

दरम्यान, या सुनावणीदरम्यान, शरद पवार आणि अजित पवार गटाला आपलं लेखी म्हणणं सादर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाकडून देण्यात आले आहेत. त्यानंतर निवडणूक आयोग निर्णय घेणार आहे.

निकाल कधी जाहीर करायचा, हे निवडणूक आयोग ठरवणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी निवडणूक आयोगाकडून निकाल दिला जातो का? ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सुनावणीवेळी दोन्ही गटांच्या वकिलांकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला.

WPL 2024 : महिला क्रिकेटसाठी गुडन्यूज! रॉजर बिन्नी-जय शाह यांंच्या नेतृत्वात कमिटी

शरद पवार हे पक्षात हुकूमशाही चालवायचे, ते पक्षात मनमानी करायचे, परस्पर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करायचे, असा युक्तिवाद अजित पवार गटाने केला. तर शरद पवार गटाच्या वकिलांनी ते आरोप फेटाळून लावले. अखेर आता दोन्ही गटांचा युक्तिवाद संपला आहे. याप्रकरणी निवडणूक आयोगाने निकाल राखून ठेवला आहे.

‘तो’ शिष्टाचारही भाजपनेही पाळावा; मलिकांवरील फडणवीसांच्या पत्राला अजितदादा गटाचे प्रत्युत्तर

दरम्यान, अजित पवार गट आणि शरद पवार गटाकडून लेखी म्हणणं सादर केल्यानंतर निवडणूक आयोगाकडून अंतिम निकाल देण्यात येणार आहे. अशातच आता आगामी निवडणुकाही लवकरच येणार असून निवडणुकीआधी निकाल हाती येणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज