Download App

Rs 2,000 Notes : ‘अरे हे चाललंय तरी काय?’ : नोटबंदीच्या निर्णयावर अजित पवारांचा संताप

Ajit Pawar : केंद्र आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) 2000 ची नोट (2000 rupee note) चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर आता संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधकांनी रिजर्व्ह बँकेच्या या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. तर भाजप (BJP) नेत्यांकडून या निर्णयाचं समर्थन आणि स्वागत केलं जातं. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी नोटबंदीच्या निर्णयावर सरकारला खडेबोल सुनावले.

कोल्हापुरमध्ये नोटाबंदीवर अजित पवार म्हणाले, मागे जुन्या 1000 च्या नोटांवर बंदी आली. तर आता 2000 च्या नोटांवर बंदी आणली. पूर्वी नोटाबंदी झाली तेव्हा सामान्य लोकांनी खूप काही सहन केलं. नोटबंदीच्या निर्णयामुळं ब्लॅक मनी बाहेर येईल, फेक करन्सीला आळा बसले असं वाटल्यानं लोकांनी त्रास सहन केला. आता ते शक्य नाही, वारंवार नोटबंदी आणली जाते आहे, हे चाललंय तरी काय? असा संताप अजित पवारांनी व्यक्त केला. ते म्हणाले, महिला वर्गाकडे लपवलेल्या 2 हजाराच्या नोटा असतील तर जा सप्टेंबरच्या आधी त्या नोटा बदलून घ्या, एवढचं राहिलं, असं अजित पवार म्हणाले.

मराठा समाजाचा आधार हरपला; विश्व मराठी संघटनेचे संस्थापक प्रवीण पिसाळ यांचे निधन

नोटाबंदीमुळे महागाई कमी होईल का? असा प्रश्न उपस्थित करत अजित पवार यांनी नोटाबंदीमागील कारण स्पष्ट करण्याचे आवाहन आरबीआय आणि केंद्राला केले. ते म्हणाले की, नोटा बदलल्या, ते ठीक आहे, लोकशाहीवर त्यांचा अधिकार आहे. आधीच्या नोटाबंदीमध्ये त्यावेळी लोकांना खूप त्रास सहन करावा लागला होता. आता 2000 च्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण नोटाबंदीमागे काय कारण आहे हे आरबीआय, केंद्राने सांगावे? असं पवार म्हणाले.

देशाच्या भल्यासाठी असेल तर त्याला कोणी विरोध करणार नाही. त्याला आमचा नेहमी पाठिंबा आहे. परंतु, मोदी सरकार ज्या पद्धतीने निर्णय घेत आहे, ते आत्तापर्यंत कोणत्याही सरकारने घेतलेले नाही. आम्ही इंदिराजींचा काळ पाहिला, अटलबिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग यांचा काळ पाहिला. सत्ताधारी म्हणून अनेक निर्णय घ्यावे लागतात. बनावट नोटा, बनावट नोटा अशा अनेक समस्या आहेत. मात्र आत्ताच असे निर्णय वारंवार का, घेतले जात आहेत. याचा खुलासा व्हायला हवा.

Tags

follow us