Download App

उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याबाबत माहिती होते का? अजित पवार म्हणाले…

Ajit Pawar said about Uddhav Thackeray’s resignation : शिवसेनेतील बंडानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडत आमदाराच्या गटाला सोबत घेऊन फडणवीसांसोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. सहकारी पक्षांना विचारात न घेता राजीनामा दिल्याची खंत शरद पवारांनी व्यक्त केली. दरम्यान ठाकरेंच्या राजीनाम्याबाबत विरोधी पक्ष नेते अजित पवार यांना विचारण्यात आले असता ते म्हणाले, हे काही अचानक घडले नाही आहे. असे वक्तव्य अजित पवार यांनी केले आहे.

एका कार्यक्रमात बोलत असताना अजित पवार यांनी अनेक राजकीय विषयावर भाष्य केले. यावेळी पवार यांना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला याबाबत विचारण्यात आले होते. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी सहकारी पक्षांना विचारात न घेता आपल्या पदाचा राजीनामा दिला. अशी खंत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केली होती. याच अनुषंगाने अजित पवार यांना देखील विचारण्यात आले.

यावर बोलताना पवार म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा दिलेला राजीनामा ही काय अचानक घडलेली घटना नाही आहे. आजचे मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे हे त्या काळात नाराज होते. याबाबत आम्ही शरद पवार तसेच उद्धव ठाकरे यांना कल्पना देखील दिली होती. शिंदे यांच्या मनामध्ये काहीतरी शिजत होते. मात्र आपण त्यांना याबाबत विचारले तर ते यावर काही बोलणार नाही. सर्वकाही ठीक आहे असेच ते सांगणार असे पवार म्हणाले.

भाजपा सरकार पाडण्यासाठी प्रयत्नशील होते...
उद्धव ठाकरेंचे सरकार राज्यात अस्तित्वात आल्यापासून भाजपा हे सरकार पाडण्यासाठी प्रयत्नशील होते. एका राजकीय नेत्याच्या पत्नीने हे बोलून देखील दाखवले होते. माझे पती वेशभूषा बदलून बाहेर जायचे. मात्र त्यांच्या धर्मपत्नीला हे माहिती नव्हते ते काय कामासाठी बाहेर जात होते? याचे अनेक अर्थ देखील निघतात. मात्र नंतर ते समजलं की हे कशासाठी बाहेर जात होते. आता त्यांच्यातील काही नेतेमंडळी सांगतात की कित्येकवेळा एकनाथ शिंदे व संबंधित व्यक्ती हे भेटले असे म्हणत पवार यांनी नाव न घेता देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.

अजित पवार सूचक बोलले, 2024 कशाला, आत्ताच मुख्यमंत्री होऊ शकतो…

गुवाहाटीला जाण्यापूर्वीचा किस्सा…
उद्धव ठाकरे यांनी विश्वासाने ठाणे जिल्ह्याची जबाबदारी एकनाथ शिंदे यांच्याकडे दिली होती. ठाण्यात कोण अधिकारी असणार ? याचे सर्व अधिकार शिंदे यांना दिले होते. मात्र निवडणूक झाली व शिंदे यांना त्यांनी नेमणूक केलेल्या अधिकाऱ्यांनी गुवाहाटीच्या दिशेने सुरक्षित कसे जाता येईल यासाठी मदत केली. मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले की त्यांना मातोश्रीवर घेऊन या मात्र ते अधिकारी शिंदे यांच्याशी वफादार राहिले व शिंदे यांच्या गाड्यांचा ताफा सुरक्षित सुरत- गुवाहाटीच्या दिशेने काढून दिला.

Tags

follow us