Ajit Pwar : देशात अनेक मोठ्या नेत्यांनी आपली विचारधारा कायम ठेऊन भिन्न विचारसरणी असणाऱ्या नेत्यांसोबत कामं केल आहे. त्यामध्ये ममता बॅनर्जी, नितीश कुमार, चंद्रबाबू नायाडू, यांच्यासह अनेक नेते आपल्याला सांगता येतील ज्यांनी सरकारमध्ये काम केलं आहे. त्या पार्श्वभूमीवर आम्ही पवार साहेबांना आग्रह केला की, आपण भाजप सरकारसोबत जाऊन काम करू. त्यावर अनेकदा विचार झाला. परंतु वारंवार भूमिका बदलण्याचं काम झालं असं म्हणत अजित पवार यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांना लक्ष केलं आहे. तसंच, मध्येच म्हणाले मी राजीनामा देतो. तुम्ही बघा असं म्हणाले. मी म्हणाले बघतो त्यात माझं काय चुकलं? असा प्रश्नही पवारांनी उपस्थित केला. ते सुनेत्रा पवार यांच्या प्रचार सभेत बोलत होते.
सुनंदा पवार यांचा बारामती लोकसभेबाबत खळबळजनक दावा! म्हणाल्या, शेवटच्या दोन-तीन दिवसांत…
मी अनेक निर्णय घेऊ शकतो
सुरूवातीपासून मी पवार साहेब म्हणतील तो निर्णय असं काम केलं आहे. ते जो काही निर्णय घेतील तो मान्य असं होत. मात्र, मीही आता 60 वर्षाच्या पुढे गेलो आहे. मी आज राज्याचं नेतृत्व करू शकतो. मी अनेक निर्णय घेऊ शकतो. एक घाव दोन तुकडे करू शकतो. आजही जर मी एखाद काम हाती घेतलं तर ते काम खनखनीत वाजवतो अशा शब्दांत अजित पवारांनी अप्रत्यक्षपणे आपली राजकीय कुचुंबना झाली असल्याची कबुली यावेळी दिली आहे.
देशाचा विचार करून यावेळी साथ द्यायची
आजही पाहाटे उठून सहा वाजता कामांची पाहणी सुरू करतो. आपल्या घराचं काम पाहण्यासाठी कुणाला वेळ नाही. मात्र, मी आजही बस स्टापचं काम कसं झालं आहे. प्रशासकीय इमारत कशी झाली आहे. सार्वजनिक काम कशी झालीत याची पाहणी करतो. जर काही खालीवर झालं असेल तर मी कॉन्ट्रॅक्टरला मी सोडत नाही असंही अजित पवार यावेळी म्हणाले आहेत. तसंच, आपल्याला देशाचा विचार करून यावेळी साथ द्यायची आहे असंही ते म्हणाले.
अजित पवारांवर बोलावं इतकी आपली पात्रता नाही, उमेश पाटलांनी घेतला जानकरांचा समाचार
तर तुम्ही घड्याळाला मतदान कराव
आज मोठी मोठी काम करायची असतील तर आपला खासदार असणं महत्वाच आहे. कारण मी राजकारणात आलो तेव्हा पुण्याला 5 टीएमसी पाणी लागत होत. आज 22 टीएमसी पाणी लागत आहे. हा मोठा बदल लोकसंख्येच्या पातळीवर झाला आहे. त्यामुळे आपल्याला जर वाटत असेल की आपला विकास व्हावा तर तुम्ही घड्याळाला मतदान कराव असं आवाहन अजित पवार यांनी यावेळी केलं आहे.