Download App

महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत अजित पवारांचे मोठे विधान

Ajit Pawar Speak On Upcomming Election : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका पाहता जागा वाटपाचा फॉर्म्युला काय असणार आहे याबात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अत्यंत महत्वाची माहिती दिली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी व ठाकरेंची शिवसेना या तोडणी एकत्र येत आगामी लोकसभेच्या 48 जागांचे वाटप करून घ्यावे. तसेच कोण कोणत्या ठिकाणाहून लढणार आहे याबाबत देखील निर्णय घ्यावा. तसेच विधानसभेच्या 288 जागावाटपाची देखील चर्चा करावी असे जाहीर वक्तव्य विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केले आहे.

अजित पवार हे आज पत्रकरांशी बोलत असताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. यावेळी बोलताना त्यांनी राज्यातील आगामी लोकसभा व विधानसभेचा फॉर्म्युला काय असणार आहे यावर भाष्य केले. काँग्रेस, राष्ट्रवादी व ठाकरेंची शिवसेना यांनी लोकसभेच्या 48 जागावाटपाबाबत चर्चा करावी. तसेच विधानसभेच्या 288 जागावाटपाची देखील चर्चा करावी.

कदाचीत काहींना असे वाटतंय की लोकसभेसोबतच विधानसभेच्या निवडणुका जाहीर होतील. यामुळे ऐनवेळेस निवडणुका लागल्या तर जागा वाटपासाठी गडबड होऊ नये तसेच यासाठी धावाधाव नको म्हणून आपण आधीच याबाबतची तयारी केलेली योग्य आहे. निवडणुकीसाठी काही जागा या राष्ट्रवादी, काँगेस यांच्यासह शिवसेनेकडून आपल्या उमेदवारांची नावे दिली जातील याबाबत चर्चा करण्यात आल्या.

दरम्यान राज्यातील आगामी निवडणुका पाहता सर्वच पक्षांकडून मोर्चे बांधणी सुरु केली आहे. यातच कोण किती जागांसाठी लढणार याबाबतचे फॉर्म्युले देखील त्यात केले जाऊ लागले. एकीकडे हे सगळं सुरु असताना राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांनी देखील महाविकास आघाडीचे येत्या काळात होणाऱ्या निवडणुकीसाठी जागा वाटप फॉर्म्युला काय असणार आहे यावर भाष्य करण्यात आले.

एक्झिट पोलचे आकडे फेल ठरले
कर्नाटक निवडणुकीच्या निकालाआधी वर्तवण्यात आलेले एक्झिट पोलचे आकडेवारी ही फेल गेली आहे. काँग्रेसला किती जागा मिळू शकतात याबाबत दाखवण्यात आलेली आकडेवारी व त्यांना मिळालेल्या जागा यामध्ये मोठी तफावत आहे.

Tags

follow us