तुम्ही आमच्या लोकांची काळजी करू नका; अजित पवारांनी फडणवीसांना झापले

Ajit Pawar speek on Devendra Fadnavis : कर्नाटक निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण देखील तापू लागले आहे. नेतेमंडळी एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करू लागले आहे. यातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका केली होती. राष्ट्रवादी महाराष्ट्रात साडेतीन जिल्ह्याचा पक्ष आहे. असे फडणवीस म्हणाले होते. फडणवीसांनी आमच्या लोकांची काळजी करण्याची काही गरजच नाही, […]

Untitled Design   2023 03 30T173023.087

Untitled Design 2023 03 30T173023.087

Ajit Pawar speek on Devendra Fadnavis : कर्नाटक निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण देखील तापू लागले आहे. नेतेमंडळी एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करू लागले आहे. यातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका केली होती. राष्ट्रवादी महाराष्ट्रात साडेतीन जिल्ह्याचा पक्ष आहे. असे फडणवीस म्हणाले होते. फडणवीसांनी आमच्या लोकांची काळजी करण्याची काही गरजच नाही, अशा शब्दात अजित पवारांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिले आहे.

अजित पवार हे साताऱ्यात पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी पक्षावर टिपण्णी केली होती. राष्ट्रवादी महाराष्ट्रात साडेतीन जिल्ह्याचा पक्ष आहे. कर्नाटकात येऊन काय करणार? इथं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मिलगीभगत आहे. हे पार्सल महाराष्ट्रात पाठवून द्या, त्याचं काय करायचे बघतो. अशी टीका फडणवीस यांनी केली होती.

यावर अजित पवार यांना विचारण्यात आले असता अजित पवार यांनी त्यांच्या खास शैलीत देवेंद्र फडणवीसांचा समाचार घेतला. फडणवीसांनी आमच्या लोकांची काळजी करण्याचं काही कामच नाही. 36 जिल्ह्यांमध्ये आम्ही जर साडेतीन जिल्ह्याचे असो तर पुढे विरोधकच उरला नाही. कारण शिवसेनेची त्यांनी ती अशी अवस्था केली. आम्ही तर साडेतीन जिल्ह्याचा पक्ष आहोत तसेच ते काँग्रेस संपली अशी विधान देखील करत असतात. असे पवार म्हणाले.

पुढे बोलतांना ते म्हणाले, सरकारला धोका नाही, असं सांगावं लागतं. मात्र परिस्थिती वेगळी आहे. अधिकाऱ्यांकडून मिळत असलेली माहिती वेगळी असल्याचं सांगून अजित पवारांनी खळबळ उडवून दिली आहे.

शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा भाजपचे आमदार रडत होते…अजितदादांनी सांगितला ‘तो’ किस्सा

बजरंगदलाच्या बंदीवर पवार म्हणाले…
कोणत्याही संघटनेने समाजात तेढ निर्माण करण्याचे काम करू नये. संविधानविरोधी कारवाई करत असल्यास त्यांच्यावर कारवाई ही आवश्य केली जावी असे अजित पवार यांनी बजरंग दलाच्या बंदीच्या आश्वासनाबाबत म्हटले. कर्नाटकमधील निवडणूक आता भावनिक झाली असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले.

Exit mobile version