Ajit Pawar : आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन अर्थसंकल्प सादर केला; अजित पवारांची केंद्रावर टिका

मुंबई : नुकताच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प संसदेत मांडला आहे. आता याच अर्थसंकल्पावरुन विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केंद्रसरकारवर टिका केली आहे. लोकसभेसह देशातील नऊ राज्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन तयार केलेला हा फसवा आणि चुनावी जुमला असलेला अर्थसंकल्प आहे, असे अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले आहे. पुढे बोलताना पवार म्हणाले, देशातील मध्यवर्गीयांना […]

Untitled Design (8)

Untitled Design (8)

मुंबई : नुकताच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प संसदेत मांडला आहे. आता याच अर्थसंकल्पावरुन विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केंद्रसरकारवर टिका केली आहे. लोकसभेसह देशातील नऊ राज्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन तयार केलेला हा फसवा आणि चुनावी जुमला असलेला अर्थसंकल्प आहे, असे अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले आहे.
Ajit Pawar on Media Conference : मी, तुम्हाला शंभर वेळा सांगतो... | LetsUpp Marathi
पुढे बोलताना पवार म्हणाले, देशातील मध्यवर्गीयांना खुश करण्यासाठी वरकरणी प्राप्तीकराची सूट मर्यादा वाढविण्याचा दिखावा करण्यात आला आहे. प्रत्यक्षात मध्यमवर्गीयांच्या सामाजिक सुरक्षेसाठी कोणतीही ठोस तरतुद अर्थसंकल्पात करण्यात आलेली नाही.

आगामी काळात कर्नाटकमध्ये निवडणुका आहे. तिथे साडेतीन हजार कोटी दिले. आपण पाहिले तर कर्नाटकला लागूनच महाराष्ट्र आहे. तर त्या कामासाठी महाराष्ट्राला देखील तेवढीच आर्थिक मदत देणे अपेक्षित होते. मात्र असे झाले नाही.

‘कररूपाने जर पाहिलं गेलं तर या देशाला सर्वाधिक कर हे महाराष्ट्र राज्य मिळवून देते आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. या गोष्टीकडे पाहिलं तर, महाराष्ट्र सर्वात जास्त कर देशाच्या तिजोरीत टाकतं, त्या प्रमाणात आपल्या राज्याला झुकतं माप द्यायला पाहिजे होतं.

पण तसं काही दिलं गेलं यामध्ये कररुपाने सर्वाधिक महसूल देणाऱ्या महाराष्ट्रासह मुंबईच्या तोंडाला पाने पुसली आहेत अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे. हा महाराष्ट्रावर झालेला अन्याय आहे, असेही पवार म्हृणाले.

मुंबईमध्ये अनेक प्रश्न आहेत ज्यासाठी जास्तीचा निधी आवश्यक आहे. मात्र अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या विकासासाठी काही ठोस पाऊले उचलण्यात आली नसल्याचं या अर्थसंकल्पातून समोर आले आहे. शेतकऱ्यांसाठी कोणताही फायद्याचा निर्णय घेण्यात आला नाही आहे, असेही पवार म्हणाले.

Exit mobile version