औरंगाबाद : राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. इथल्या शेतकरी मेळाव्यात (Farmers meeting) संवाद साधताना अजित पवारांनी थेट पैठणचे मंत्री संदीपान भुमरेंवर (Sandipan Bhumre) निशाणा साधलाय. मंत्री संदीपान भुमरे यांनी तालुक्यात ९ दारूची दुकाने आणली, याबरोबरच लोकांनी दारूच्या दुकानात जावे याकरिता दुकानासमोर स्पीड ब्रेकर तयार केला, आपण शाळा, महाविद्यालयासमोर विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये म्हणून स्पीड ब्रेकर लावतो. मात्र भुमरेंनी दारूच्या दुकानासमोर ब्रेकर लावली आहेत, जेणेकरून लोकांनी गाडी थांबवून दारूचे सेवन करावे. भुमरे हे पाप कुठे फेडाल, असा असा खोचल सवाल राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मंत्री संदीपान भुमरे यांच्यावर केला.
गेल्या १३ वर्षातही औरंगाबाद-पैठण रस्त्याचं चौपरदीकरण करता आलं नाही तर तुमचं ब्रम्हदेवही काही करू शकत नाही.’ असं म्हणत अजित पवार यांनी संदीपान भुमरेंवर टीका केलीय. “पैठण तालुक्यात जायकवाडी धरण, दोन सहकारी साखर कारखाने, संत ज्ञानेश्वर उद्यान, आप्पेगाव विकास प्रतिष्ठान, उपसा सिंचन योजना, एमआयडीसी, महाविद्यालय, हे सारं काही राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसने दिलंय…मग संदीपान भुमरेंनी पैठणला काय दिलं ? असा सवाल देखील अजित पवार यांनी केलाय.
औरंगाबादला तीन मंत्रिपद मिळूनही म्हणावा तसा विकास झाला नाही. बैठका घेऊन कामांचा आढावा घेतला पाहिजे पण तसे काही होताना दिसून येत नाही, सध्या राज्यात जोरात भ्रष्टाचार सुरू आहे, जवळच्या माणसांना योजनांचे कंत्राट देण्यात येते. संदीपान भुमरे हे आमदार नसून औरंगाबादचे पालकमंत्री आहेत. पालकमंत्री हा जिल्ह्याचा मुख्यमंत्रीसारखा असतो. पण सध्याच्या पालकमंत्र्याचा काहीही फायदा नाही.
पैठणमध्ये शासकीय जागा स्वतःच्या नावावर करण्याचा प्रयत्न करण्यात आला, आरोपही करण्यात आला. तसंच इथे आरोग्याचा प्रश्न गंभीर आहे, असं म्हणत अजित पवारांनी भुमरेंना टार्गेट केलंय. पैठण तालुक्यात दोन साखर कारखाने, जायकवाडी धरण, संत ज्ञानेश्वर उद्यान, आपेगाव विकास प्रतिष्ठान, ब्रम्हगव्हाण उपसा सिंचन योजना हे सगळे काँग्रेस, राष्ट्रवादीने दिले, तरी भुमरेंनी तालुक्याला काय दिले ? भुमरे म्हणजे, हे दारू… हे दारू…” असा अजित पवारांनी मंत्री संदीपान भुमरेंवर हल्लाबोल केलाय.