Download App

मविआची सत्ता आल्यास अजित पवारच मुख्यमंत्री, ठाकरे गटाने दिला राष्ट्रवादीला प्रस्ताव

  • Written By: Last Updated:

Ajit Pawar will be the Chief Minister, Uddhav Thackeray gave a big proposal to Sharad Pawar : सत्तासंघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टाने राखून ठेवला आहे. हा निकाल काय लागतो, याकडे सर्वांच लक्ष लागलं. सुप्रीम कोर्टाचा निकाल ठाकरे गटाच्या बाजूने लागला तर राज्य सरकार कोसळू शकतं. त्यामुळं भाजपकडून आता हालचाली सुरू झाल्यात. त्याचाच भाग म्हणून अजित पवार (Ajit Pawar) हे भाजपात (BJP) प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर अजित पवारांनी माध्यमांसमोर येत या चर्चेंच खंडन केलं. मी राष्ट्रवादीतच (NCP) राहणार असं ते म्हणाले. त्यानंतर शरद पवार यांनी मविआच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार वक्तव्य करत मोठी खळबळ उडवून दिली. दरम्यान, आता महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) एकत्र बांधून ठेवण्यासाठी ठाकरे गटाने पुढाकार घेतल्याची माहीती आहे. आगामी निवडणुकांत मविआची सत्ता आल्यास राष्ट्रवादीला सीएम पद देण्याचा प्रस्ताव त्यांनी राष्ट्रवादीला दिल्याची माहिती आहे.

पुढील वर्षात लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक आहे. या निवडणुकांसाठी राज्यातील सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. केंद्रात आणि राज्यात सत्तारूढ असलेल्या भाजपविरोधात राज्यात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि ठाकरे गट यांची महाविकास आघाडी वज्रमुठ सभांच्या माध्यमातून वातावरण निर्मिती करत आहे. हे तीनही पक्ष करत आहेत. मात्र अजित पवार भाजपात जाणार ह्या चर्चेमुळे आणि शरद पवारांच्या 2024 मध्ये आम्ही महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे की, नाही? हे आत्ताच कसं सांगणार? आज आमची आघाडी आहे. एकत्र काम करायची इच्छा आहे. पण, फक्त इच्छाच नेहमी पुरेशी नसते, असं वक्तव्य केल्यानं मविआच्या आगामी निवडणुकांमध्ये एकत्र लढण्यावरून साशंकता निर्माण झाली.

भारताशी दोन हात करण्याची आमची कुवतच नाही; पाकच्या लष्करप्रमुखांची कबुली

दरम्यान, या सगळ्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी टिकावी याासठी उद्धव ठाकरेंनी पुढाकार घेतला असल्याची माहिती आहे. याचाच भाग म्हणून उद्धव ठाकरेंनी आगामी काळात महाविकास आघाडीची सत्ता आल्यास राष्ट्रवादीला मुख्यमंत्री पद देण्याची तयारी दर्शवली असून तसा प्रस्तावच त्यांनी राष्ट्रवादीला दिल्याची माहिती आहे.

महाविकास आघाडीमध्ये कोणाला जागी कितीही आल्या तरी मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होईल, अशी ग्वाही ठाकरेंनी पवारांनी दिली. राज्यात १९९९ मध्ये, २००४ मध्ये राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होऊ शकला नाही. त्यामुळे आता सत्ता स्थापन करण्याची संधी मिळाल्यास राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री असणार. महाविकास आघाडीचं नेतृत्व कोणीही करत केलं तरी सीएम पद हे राष्ट्रवादीकडे असेल. अजित पवार मुख्यमंत्री झाले तरी आमची हरकत नाही, असे प्रस्ताव उद्धव ठाकरेंनी शरद पवारांना दिले.

अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी झालेल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, आगामी 2024 च्या निवडणुकीनंतर माझी मुख्यमंत्रीपदावर दावेदारी ठेवण्याची तयारी आहे. मला आताही 100 टक्के मुख्यमंत्री होण्यास आवडेल, असं सांगितलं. त्यामुळं अजित पवार हे सीएमपदासाठी किती आग्रही हे दिसून येतं. अजित पवार आणि राष्ट्रवादी मविआतून बाहेर पडली तर सगळं भाजपला अनुकूल होईल. त्यामुळेच ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या भविष्याच्या दृष्टीने राष्ट्रवादीला दिली असल्याची चर्चा आहे.

Tags

follow us