Ajit Pawar ON Shivsena Advertisement: शिवसनेने राज्यातील वृत्तपत्रात राष्ट्रात मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे अशी जाहिरात दिली आहे. यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की जाहिरात देणाऱ्याने आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. उलट या जाहिरातबाजीने त्यांनी स्वत:चं हसं करुन घेतलं आहे. एवढा जर पाठिंबा आहे तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करा आणि जनतेच्या मैदानात या, कोणाच्या पाठिशी किती जनता आहे हे समजलं, असे आव्हान अजित पवार यांनी दिलं आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष स्वत:कडे खेचून घेताना आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे आहेत, आम्ही आनंद दिघे यांच्या विचाराचे आहोत पण त्या जाहिरातीमध्ये आनंद दिघेंचा फोटो नाही, बाळासाहेबांचा फोटो नाही, अशाप्रकारची जाहिराती पाहिली पण स्वत: ठरवून सर्व्हे केला. उद्या कोणी सर्व्हेक्षण केलं? कोणी सांगितले कोणाला किती टक्के? निवडणुकीच्या काळात जे सर्व्हे केले जातात त्या सांगितले जाते की कोणी सर्व्हेक्षण केलं. तसा हा सर्व्हे कोणी केलेला? एखाद्या सर्व्हेक्षणाची जाहिरात करण्याचा विश्वविक्रम मुख्यमंत्र्यांनी केला आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे.
‘शिवसेना उद्धवस्त करण्याचा प्रयत्न केला आता भाजपलाही’.. राऊतांचा शिंदेंवर गंभीर आरोप
ते पुढं म्हणाले की जाहिरात कशाकरता केली जाते तर आपण केलेलं काम जनतेपर्यंत पोहोचावं किंवा जाहिरातीवर मोठ्या एजन्सी खर्च का करतात तर लोकांना माहिती होण्यासाठी. यांचं काम एवढंच चांगले असेल तर अशाप्रकारच्या पानभर जाहिराती का द्याव्या लागतात. पण त्या जाहिरातीमध्ये जो सर्व्हे दाखवण्यात आला आहे, त्यामध्ये एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून जनतेने कौल दिलेला आहे. याचा खुपच आनंद वाटला की लोकांना यापुढं देखील मुख्यमंत्री व्हावेत असं वाटायला लागलं आहे. एवढा जर लोकांचा पाठिंबा आहे तर स्थानिक स्वराज्य संस्थ्यांच्या निवडणुका का घेत नाहीत? असा सवाल अजित पवार यांनी केला आहे.
सीएम शिंदेंकडून फडणवीसांना बगल; जाहिरातबाजीवर दरेकर आक्रमक
शिवसेना आमचीच असा दावा करणाऱ्यांनी जाहिरातीमध्ये नरेंद्र मोदींचा फोटो टाकला. नरेंद्र मोदींमुळे आणि त्यांच्या पक्षामुळे हे मुख्यमंत्री झाले आहेत. स्वत:चा फोटो टाकला पण बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो वगळलेला आहे. हा बाळासाहेबांचा अपमान नाही का? त्या जाहिरातीमध्ये राज्याचा विकास आणि जनतेचे प्रश्न बाजूला ठेवले आहेत. त्यामध्ये विकासाचे आकडे दिले असते, जीडीपीबद्दल काही आले असते, शेतकऱ्यांच्या मदतीचे आकडे दिले असते असे काही दिले नाही. पण मीच कसा लोकप्रिय याची स्पर्धा ह्यांच्यात सुरु आहे, अशी टीका अजित पवार यांनी केली आहे.
Shivsena Advertisement : भल्या मोठ्या जाहिरातीवर CM शिंदेंचं थोडक्यात उत्तर
गेल्या वेळी केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र अशी जाहिरात भाजपने केली होती. आता ती घोषणा मागे पडली आणि राष्ट्रात मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे ही नवी घोषणा आली आहे. आता भाजपच्या लोकांना देखील ही घोषणा द्यावी लागणार आहे. भाजपाला ही घोषणा मान्य आहे का? देवेंद्र फडणवीस पेक्षा एकनाथ शिंदेंना जनता अनुकूल आहे असे जाहिरातीमध्ये दावखले आहे हे भाजपाला मान्य आहे का? असा सवाल अजित पवार यांनी केला आहे.