Download App

राज ठाकरेंप्रमाणे मीही काकांकडे लक्ष ठेवेन, ‘त्या’ सल्ल्यावर अजित पवारांचं उत्तरं

  • Written By: Last Updated:

“राज ठाकरे यांनी जसं त्यांच्या काकाकडे लक्ष ठेवलं तसं मीही माझ्या काकाकडे लक्ष ठेवलं” असं उत्तर आज अजित पवार यांनी राज ठाकरे यांना दिल आहे. काल राज ठाकरे यांनी एका मुलाखतीमध्ये अजित पवार यांनी काकांकडे लक्ष ठेवावं असं म्हटलं होत. त्यावर अजित पवार यांनी आज उत्तर दिलं.

काय म्हणाले होते राज ठाकरे ?

मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe)आणि अमृता फडणवीस (Amrita Fadnavis) यांनी मुलाखत घेतली. यावेळी त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काय सल्ला द्याल असा प्रश्न विचारला त्यावर राज ठाकरे म्हणाले मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जपून राहण्याचा सल्ला देईल.

Amol Kolhe : ‘हिंदुत्वा’च्या बाबतीतील राज ठाकरे यांची भूमिका मला पटली

याशिवाय देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना वर संबंध नीट ठेवा. असा तर अजित पवार (Ajit Pawar) यांना जेवढं लक्ष बाहेर ठेवता तेवढं काकांकडेही लक्ष द्या. असा सल्ला राज ठाकरे यांनी या मुलाखतीमध्ये दिला होता.

त्यावर आज अजित पवार यांनी उत्तर दिल ते म्हणाले की ,”राज ठाकरे यांनी जसं त्यांच्या काकाकडे लक्ष ठेवलं तसं मीही माझ्या काकाकडे लक्ष ठेवलं”

अमोल कोल्हे यांच्या बोलण्याला शुभेच्छा

याशिवाय काल एका कार्यक्रमात बोलताना खासदार अमोल कोल्हे म्हणाले होते की, “महाराष्ट्र राज्याचं सर्वाधिक वेळ अर्थमंत्री पद जयंत पाटील यांनी भूषवलं. त्यामुळं त्यांच्याकडे माझ्यासारखा कार्यकर्ता महाराष्ट्राचा सर्वांत आदर्श मुख्यमंत्री म्हणून पाहतो. जयंत पाटील यांच्यासारख्या सुशिक्षित आणि सुसंस्कृत नेत्याची आज राज्याला मुख्यमंत्री म्हणून अत्यंत गरज आहे.”

त्यावर देखील अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला, त्यावर अमोल कोल्हे यांच्या बोलण्याला शुभेच्छा असं उत्तर अजित पवार यांनी यावेळी दिलं.

Amol Kolhe : ‘हिंदुत्वा’च्या बाबतीतील राज ठाकरे यांची भूमिका मला पटली

Tags

follow us