मागच्या काही दिवसापासून राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी होणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यात गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षनेते अजित पवार हे सरकारमध्ये सहभागी होत असल्याच्या चर्चा रंगत आहेत. अजित पवार आणि राष्ट्रवादी यांना जवळ करण्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज आहेत. असं सांगितलं जात आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर येणार होते, पण अचानक त्यांचा दौरा रद्द झाला आहे.
आजपासून दोन दिवसांसाठी अमित शाह नागपूरमध्ये येणार होते. ते भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेणार होते. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राजकीय बैठक घेऊन चर्चा करणार होते. यादरम्यान त्यांचा अचानक दौरा रद्द झाल्यानं तर्क-वितर्क वर्तवले जात आहेत.
Ajit Pawar यांच्या मुख्यमंत्रीपदासाठी दिल्लीत हालचाली, ‘या’ नेत्याने दिला दुजोरा
दोन दिवसापूर्वी पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांचं निधन झालं आहे. बादल यांच्या निधनानंतर केंद्र सरकारने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. यामुळे अमित शाह यांनी आपला दौरा रद्द केलं असल्याची माहिती समोर येत आहे.