Download App

Video : अमित ठाकरेंनी दिले सत्तेत सहभागी होण्याचे संकेत, राजकीय वर्तुळात चर्चा

Amit Thackeray on MNS Kamgar Sena meeting : गेल्या काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यातील जवळीक वाढली आहे. राज ठाकरे देखील हक्काने पत्रं किंवा ट्विटद्वारे दोघांनाही सल्ला देत असतात. तसेच आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत ठाकरे नावाचा ब्रॅड भाजपला आपल्या सोबत हवा आहे. त्यामुळे भाजप, शिंदेंची सेना आणि मनसे यांची युती होईल अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. अशात मनसेचे युवा नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी मोठा दावा करत खळबळ उडवून दिली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचा मेळावा आज मुंबईत आयोजित करण्यात आला होता. यावेळी अमित ठाकरे यांनी लवकरच सत्तेत येण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. अमित ठाकरे म्हणाले की आपण इथे फक्त कामगार सेनेची ताकद बघायला आलोय. तुम्ही उगाचं नाव घेतात. हे सगळे तुमचे कष्ट आहेत. तुम्ही म्हणालात कधी कधी 50 टक्के कामं पूर्ण होतात, कधी कधी कामं होत नाहीत. पण आपण लवकरच सत्तेत असू, आपली 100 टक्के कामं पूर्ण होतील, असं वक्तव्य अमित ठाकरे यांनी केलं आहे.

Radhakrishna Vikhe : वज्रमुठीला तडे गेलेत, थोड्या दिवसात हे एकमेकांविरुद्ध मुठ उगारतील

दरम्यान, मनसेच्या कामगार मेळाव्याला अमित ठाकरे, शर्मिला ठाकरे, मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर, शिरीष सावंत, मनसे कामगार सेनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण, मनसे प्रवक्ते गजानन काले उपस्थित होते. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कामगार मेळाव्याला अनुपस्थित होती.

अजितदादांची घरातच कुस्ती चाललीये; नांदगावकरांचा मिश्किल टोला

मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी एका कार्यक्रमात बोलताना राज्यातील सध्याच्या स्थितीवर भाष्य केले आहे. राज्यांमध्ये सध्या अनेक कुस्त्या सुरू आहेत. एका नेत्याची दुसऱ्या नेत्याबरोबर कुस्ती सुरू आहे. अशातच आपल्या राज साहेबांनी एन्ट्री केल्यास काय होईल हे तुम्हाला माहितीच आहे, असे ते म्हणाले आहेत.

मनसेचे नेते बाळा नांदगावकर हे यावेळी एका कार्यक्रमामध्ये बोलत होते. तेव्हा त्यांनी आमच्या पक्षाने देखील मुंबईत काल कुस्त्यांचा कार्यक्रम आयोजित केला होता असे सांगितले. त्यावर बोलताना पुढे ते म्हणाले की, राज्यामध्ये सध्या इतक्या कुस्त्या चालू आहेत, त्यामध्ये आमच्या लोकांनी पण कशाला कुस्त्यांची स्पर्धा आयोजित केली, असे मी त्यांना म्हणालो.

राज्यात सध्या उद्धव ठाकरे यांची एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत कुस्ती सुरू आहे. तर अजित पवार यांची घरातच कुस्ती सुरू आहे, असा मिश्किल टोला त्यांनी लगावला आहे. तसेच बारसूमध्ये एक कुस्ती सुरू आहे. आता सहा तारखेला राज ठाकरे यांची देखील सभा होणार आहे. या कुस्त्यांमध्ये राज साहेबांनी एन्ट्री केल्यास काय होईल? हे तुम्हाला माहितीच आहे, असे ते म्हणाले आहेत.

 

Tags

follow us