Amol Kolhe : ‘हिंदुत्वा’च्या बाबतीतील राज ठाकरे यांची भूमिका मला पटली

Amol Kolhe Said ‘I really liked Raj Thackeray’s line on Hindutva’: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची काल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी आणि राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत राज ठाकरे यांनी अनेक सामाजिक मुद्द्यांवर मनमोकळेपणाने आपली आणि मनसेची भूमिका मांडली. या […]

Untitled Design   2023 04 27T111707.356

Untitled Design 2023 04 27T111707.356

Amol Kolhe Said ‘I really liked Raj Thackeray’s line on Hindutva’: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची काल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी आणि राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत राज ठाकरे यांनी अनेक सामाजिक मुद्द्यांवर मनमोकळेपणाने आपली आणि मनसेची भूमिका मांडली. या मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांनी तुफान फटकेबाजी केली आहे. दरम्यान, आता अमोल कोल्हे यांनी राज ठाकरे मुलाखतीविषयी भाष्य केलं. त्यांनी राज ठाकरेंच्या हिदुत्वाच्या भूमिकेचं स्वागत करत मला राज ठाकरेंची हिंदुत्वावाची भूमिका (Raj Thackeray’s role in Hinduism) आवडली असं सांगितलं.

अमोल कोल्हे यांनी सांगितलं की, आजच्या तरुणाईचं जे म्हणणं आहे की, हिंदुत्व म्हणजे, केवळ परधर्माचा द्वेष नको, आणि सेक्युल्यॅरिझम म्हणजे, विशिष्ट कुठल्याही धर्माचा लांगुलचालन नको, ही जी तरुणाची व्याख्या आहे, ती मान्य करण्यासारखी आहे, असं राज ठाकरेंनी सांगितलं. त्यांनी ज्या पध्दतीने हिंदुत्वाची परिभाषा समजावून सांगितलं त्यावरून हिंदुत्वा बाबतीत राज ठाकरे यांची जी लाईन आहे, ती मला फार आवडली असून त्यांनी हिंदुत्वाची परिभाषा नेमकेपणाने माडंल्याचं अमोल कोल्हे यांनी सांगितलं.

Malaika Arora: मलायकाला ‘बदकासारखी चाल’ म्हणणाऱ्या ट्रोलर्सना दिलं सडेतोड उत्तर, म्हणाली…

ते म्हणाले, मुलाखत चांगली झाली, असं सगळे सांगत आहेत. त्यामुळे मलाही वाटतं की, मुलाखत ठीक झाली असावी. एक डॉक्टर आणि अभिनेता म्हणून मी आजवर वावरत आलो. काम करत आलो. पण पहिल्यांदाचा मुलाखतकार म्हणून मी कुणाची तरी मुलाखत घेत होतो. हा माझ्यासाठी फार वेगळा अनुभव होता. राज ठाकरेंची ही घेतलेली मुलाखत ही स्क्रिप्टेड नव्हती. त्यामुळं ते मनमोकळेपणे व्यक्त आणि दिलखुलासपणे बोलले. त्यांची हिंदुत्वाची व्याख्या मला आवडली ते लोकशाहीबद्दल अत्यंत समर्पक बोलले.

कोल्हे म्हणाले, राज ठाकरे यांनी मुलाखतीदरम्यान अनेक बेधडक प्रश्नांची सडेतोड उत्तर दिली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकशाहीबद्दल त्यांनी जे काही सांगितलं. ते त्यांनी अगदी व्यवस्थित सांगितलं आहे. राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवरही राज ठाकरे बोलले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असुदेत किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असू देत यांच्यावर राज ठाकरे यांनी जे काही भाष्य केलेलं आहे. ते ऐकून मला असंच वाटतं की ते निर्भीडपणे बोललेत ते बेधडक बोललेत, असंही ते म्हणालेत.

गेल्या वर्षी राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्याविरुध्द आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर यंदा झालेल्या गुढीपाडव्याच्या भाषणात राज ठाकरेंनी सांगितलं होतं की, मला धर्मांध हिंदू नको आहे, मला धर्माभिमानी हिंदू हवा. जो स्वत:चा धर्म बघेल, दुसऱ्या धर्माचाही मान राखले. मला माणसं हवीत, मुस्मिम धर्मातील देखील माणसं हवीत. पण,
पाकिस्तानमध्ये जाऊन २६/११ च्या हल्ल्यांबद्दल कडक शब्दांत सुनावून येईल अशी माणसं हवीत, असं राज ठाकरे म्हणाले.

 

Exit mobile version