Amol Kolhe : एका वर्षापूर्वी भाजपने शिवसेनेत (Shiv Sena) फुट पाडून शिंदे गटाला आपल्यासोबत घेतलं होतं. त्यानंतर आता काही दिवंसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करून अजित पवार (Ajit Pawar) गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाला. शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र होतील आणि सरकार कोसळेल म्हणून भाजपने अजित पवार गट सोबत घेतला, अशी चर्चा सुरू आहे. मात्र, राष्ट्रवादीचे नेते अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव होऊ शकतो, कारण जनमत भाजप विरोधात आहे, त्यामुळं पक्षांमध्ये भाजपकडून (BJP) फुट पाडली जात असल्याचं मोठं विधान केलं. (Amol Kolhe Telling Inside Story of Ajit Pawars Rebellion BJP is afraid of defeat)
अमोल कोल्हे यांनी त्यांच्या ‘अमोल ते अनमोल’ या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ अपलोड केला आहे. यामध्ये त्यांनी सध्या राज्यात स्थापन झालेल्या ट्रिपल इंजिन सरकारची इनसोईट स्टोरी सांगितलं. ते म्हणाले, राज्यात ट्रिपल इंजिनचे सरकार स्थापन झाल्यानंतर लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. अनेकांनी या घटनेचा निषेध केला. पण bjp वर ही वेळ का आली? तर 27 जून 2023 रोजी नरेंद्र मोदींनी भोपाळमध्ये भाषण केले. त्यावेळी त्यांनी हमी दिली होती. राष्ट्रवादीने 70 हजार कोटींचा घोटाळा केला. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा, महाराष्ट्र सिंचन घोटाळा, बेकायदेशीर खाण घोटाळा यांवर कारवाईची हमी मोदींनी दिली होती. पण 2 जुलै 2023 रोजी अजित पवार सत्तेत सहभागी झाले. आता राष्ट्रवादीतील एक मोठा गट सत्तेत गेला आहे. त्यामुळं मोदींनी दिलेल्या हमीचं काय? असा सवाल त्यांनी मोदी सरकारला केला.
1960 मध्येच पवार कुटूंबात राजकीय मतभेद, खुद्द शरद पवारांनी केला आपल्या भावाविरोधात प्रचार
कोल्हे यांनी भाजपच्या तोडा-फोडा या नीतीची कारणमीमांसा करतांना सांगितलं की, राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थिर होतं. विधानसभेतील एकूण 288 आमदारांपैकी भाजपचे 106 आमदार आहेत. शिंदे गटाचे 40 आणि शिंदेचे विधानपरिषदेतील 3 आमदार, नऊ अपक्ष आमदारांचा पाठिंबा हे सगळं संख्याबळ पाहिलं तर एकत्रित बहुमताचा आकडा 154 होता. त्यामुळं सरकारला धोका नव्हता. मग असं असले तरी अजित पवार यांना सत्ताधारी पक्षाने सोबत का घेतलं आणि त्यांना भाजपची 6 आणि शिंदे यांची 3 खाती त्यांना का देण्यात आली.? तर हे घडण्यामागे 2024 च्या लोकसभा निवडणुका हे कारण आहे. 1977 पासून देशातील जनतेने एकाही पक्षाला सलग तीन वेळा सलग सत्ता दिली नाही. भाजपचे दोन टर्म पूर्ण झाल्या. तिसऱ्या टर्मला धोका आहे, अशी स्थिती देशात निर्माण झाली. कारणं भाजपने दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. दोन कोटी तरुणांना रोजगार देऊ, महागाई कमी करू ही आश्वासनं पूर्ण करण्यात भाजप सपशेल अपयशी ठरलं.
ते म्हणाले, हिदीं हार्टलॅंडवर भाजपची मदार आहे. पण, देशात 14 राज्यातं भाजपचं सरकार नाही. त्यात केरळ, कर्नाटक, तमिळनाडू, तेलंगणा, आंद्रप्रदेश, झारखंड, राजस्थान, ओडीसा, दिल्ली, पजाब, हिमाचल प्रदेश या राज्यांचा समावेश आहे. या राज्यांमध्ये लोकसभेच्या 309 जागा आहेत. 2019 च्या आकडेवारीनुसार, 309 जागांपैकी 129 जागांवर भाजपचा विजय झाला होता. त्यात भाजपने उत्तरप्रदेशमध्ये 80 पैकी 6, महाराष्ट्रात 48 पैकी 23 जागा, बिहारमध्ये 40 पैकी 17 जागा, मध्यप्रदेश 29 पैकी 28 जागा, कर्नाटकमध्ये 28 पैकी 25 आणि राजस्थानमध्ये 25 पैकी 24 जागा भाजपने मिळाल्या होत्या.
ते म्हणाले, मध्यप्रदेशचा पुढच्या काही महिन्यात निडणुक आहेत. इथं भाजपला अनुकूल वातावरण नाही. उत्तरप्रदेश विधानसभेच्या 2017 च्या निवडणुकीत ला समाजवादी पक्षाला 47 जागा मिळाल्या होत्या आणि भाजप विजयी झालं होतं. तर 2020 च्या विधानसभा निवडणुकीत सपाच्या 62 जागा वाढल्यात. त्यामुळं युपीत भाजपला धोक्याची घंटा आहे. थोडक्यात बिहार, उत्तर प्रदेश, कर्नाटकात भाजपची पिछेहाट होताना दिसत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून जास्तीत जास्त खासदार निवडून आणणं ही भाजपचा डाव आहे. त्यासाठी आधी शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादीत फुट पाडल्याचे कोल्हे म्हणाले.