Download App

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या माध्यमातून मोठा भ्रष्टाचार, शरद पवारांचं थेट मुख्य सचिवांना पत्र

उपमुख्यमंत्री आणि शरद पवार यांचे पुतणे अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री असतानाच पवार यांनी हे पत्र लिहून तक्रार केली आहे.

  • Written By: Last Updated:

Sharad Pawar on Pune Agricultural Produce Market Committee : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विद्यमान संचालक मंडळाबाबात स्वत: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी ट्वीट करून मोठा दावा केला आहे. (Pune) या संचालक मंडळाच्या माध्यमातून मोठा भ्रष्टाचार सुरू असल्याचं शरद पवार यामध्ये म्हणाले आहेत. त्याचबरोर त्यांनी याविषयी थेट राज्य सरकारच्या मुख्य सचिवांना पत्रही लिहलं आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री आणि शरद पवार यांचे पुतणे अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री असतानाच पवार यांनी हे पत्र लिहून तक्रार केल्याने उलट-सुलट चर्चा सुरू आहे.

शरद पवार यांचं काय आहे ट्वीट?

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विद्यमान संचालक मंडळाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता व गैरकारभार झाल्याच्या तक्रारी आहेत. म्हणूनच, कृषी उत्पन्न बाजार समितीतील गैर कारभाराबाबत सखोल चौकशी करून उचित कारवाई व्हावी, ह्यासाठी महाराष्ट्र शासनाला अवगत करण्यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिलं. महाराष्ट्र सरकार ह्या प्रकरणाची गांभीर्याने नोंद घेऊन कारवाई करेल अशी अपेक्षा.

जरांगेंविरोधात सदावर्ते मैदानात! मुंबईकडे कूच करण्याआधीच गुन्हा दाखल करून अटकेची केली मागणी

एप्रिल 2023 मध्ये झालेल्या निवडणुकीत अतिआत्मविश्वासात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला पक्षाच्या बंडखोरांनी दणका दिला होता. भाजपच्या पाठबळावर राष्ट्रवादीतील बंडखोरांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दणका देत बाजार समितीची सत्ता हस्तगत केली हेाती. मात्र, अडीच वर्षांनंतर काळभोर यांनी राजीनामा दिल्याने आणि राष्ट्रवादीही महायुतीत भाजपसोबत असल्याने अजितदादा समर्थकांच्या इच्छा पुन्हा पल्लवित झाल्या.

2023 मध्ये झाली होती मागणी

follow us