जरांगेंविरोधात सदावर्ते मैदानात! मुंबईकडे कूच करण्याआधीच गुन्हा दाखल करून अटकेची केली मागणी

Gunaratna sadavarte against manoj jarange; demands arrest by filing a case before marching towards mumbai : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, यासह अनेक मागण्यांसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मैदानात उतरले आहे. शुक्रवार 29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे हे आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत धडकणार आहे. त्यासाठी आंदोलनाचा मार्ग देखील निश्चित झाला आहे. दरम्यान जरांगे मुंबईला निघण्याआधी आंदोलनाच्या विरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी पोलीस प्रशासनाकडे धाव घेतली आहे. सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांना 29 ऑगस्टला मुंबईत येऊ देऊ नये अशा प्रकारचं पत्रच पोलीस महासंचालकांना, मुंबई पोलीस आयुक्तांना दिले आहे.
मोठी बातमी! लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर बीडमध्ये दगडफेक, वातावरण चिघळलं, वाचा काय घडलं?
सदावर्ते यांनी आजाद मैदान पोलिसांची भेट घेऊन गणेशोत्सव काळात अडथळा निर्माण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात पोलिसांना गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
‘जरांगे राजकारणासाठी सरकारला ब्लॅकमेल करत आहे’. असा आरोपही त्यांनी यावेळी केलाय. जर जरांगेवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली नाही, तर माननीय उच्च न्यायालयात आपण धाव घेणार असल्याचा इशाराही गुणरत्न सदावर्ते यांनी दिलाय.
सर्व शक्ती पणाला, तरी इराणमध्ये ऑपरेशन यशस्वी करणाऱ्या इस्रायलला हुती कमांडर्सला मारण्यात अपयशी का?
काय म्हणाले गुणरत्न सदावर्ते?
ॲडव्होकेट सदावर्ते म्हणाले की, “सामान्य माणसासाठी भारताचे संविधान आहे. सामान्य मुंबईकराला कसलाही त्रास होणार नाही यासाठी आम्ही आज पोलीस ठाण्यात दाखल झालो आहोत. गणेशोत्सवात जेंव्हा मुंबईत मोठी गर्दी असते त्यात अडसर ठरावा म्हणून राजकीय भांडवल करत जरांगे यांनी मुंबईत येऊन आंदोलन करण्याचे ठरवले आहे. हे आंदोलन होऊ नये म्हणून आम्ही त्यांच्याविरोधात कायदेशीर तक्रार करतो आहोत. अझाद मैदान पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी दिलेली नाही. सगळ्या पक्षांना जो कायदा लागू आहे तोच जरांगेलाही लागू आहे”.
असंविधानिक गोष्टी घडवून आणण्याचा प्रयत्न
पुढे सदावर्ते म्हणाले की, “या आंदोलनाच्या आडून अत्यंत असंविधानिक गोष्टी घडवून आणण्याचा प्रयत्न केला जातोय. पोलीस महासंचालक कार्यलयात त्यासाठी आम्ही तक्रार दाखल केलेलीआहे. आज आझाद मैदानात तक्रार दाखल करताना आम्ही पुरावे देखील दिलेले आहेत. जरांगे यांना हे आंदोलन करताच येणार नाही कायद्यानुसार करता येणार नाही. जरांगे पाटीलवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, तो कुठल्या कलमानुसार झाला पाहिजे तेही आम्ही सांगितलं आहे. लोकांना त्रास सहन करावा लागेल. अनेक व्यवसायांचं नुकसान होईल म्हणून हा गुन्हा दाखल करावा यासाठी प्रयत्न केलेले आहेत. जरांगे हे मुंबईत काहीतरी गडबड करण्यासाठी येतायत आंदोलन फक्त निमित्त आहे” असा आरोपही सदावर्ते यांनी यावेळी केला.
कायद्यापेक्षा कुणीही मोठं नाही
पुढे इशारा देत सदावर्ते म्हणाले की, “मुंबईत जरांगेंना येऊ देऊ नका, कायद्यापेक्षा कुणीही मोठं नाही. राजकीय हितापोटी माणसे पुढे येतात, त्यांना थांबवण्याची गरज आहे. जर एखादा निकाल न्यायालयाने दिला असेल तर त्याच्या विरोधात कोणालाही जाता येत नाही. जर जरांगे मुंबईत आले तर ‘कंटेम्प्ट ऑफ कोर्ट’ होईल. त्यासाठी सहा महिन्याच्या शिक्षेची तरतूद आहे”. असेही सदावर्ते यांनी यावेळी सांगितलं.