खासदार उदयनराजे भोसले यांचा आम्हाला नेहमीच पाठिंबा, पण सगळ्याचं गोष्टीत राजकारण आणलं तर आयुष्याची मजाच संपून जाणार असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केलंय. दरम्यान, आज अमोल कोल्हे यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेऊन शिवपुत्र छत्रपती शंभूराजे महानाट्याचे निमंत्रण दिले आहे. यावेली त्यांनी आपलं मत व्यक्त केलंय.
राधाकृष्ण विखे पाटलांशी दोस्ती पण… अब्दुल सत्तारांनी घेतला यूटर्न
या भेटीदरम्यान, कोल्हे आणि उदयनराजेंची चर्चा झाली. यावेळी बोलताना खासदार कोल्हे म्हणाले, खासदार उदयनराजे भोसले आणि माझे चांगले ऋणानुबंध आहेत. त्यांचा नेहमीच आम्हाला पाठिंबा राहिला आहे, पण सगळ्याच गोष्टीत राजकारण आणल्या, तर आयुष्याची मजा संपून जाईल. राष्ट्रवादीचा खासदार जर भाजपच्या खासदाराला भेटला असेल, तर नक्कीच राजकारण आहे, असंही ते म्हणाले आहेत.
Barsu Refinery : सरकारच्या विरोधात उद्धव ठाकरे मैदानात; आंदोलकांची भेट घेण्यासाठी बारसूला जाणार
उदयनराजे यांना छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणारा कलावंत भेटला तर राजकारण होणार नसल्याचंही खासदार कोल्हे यांनी स्पष्ट केलंय. सध्याचे सरकार कधी पडेल यावर मी ज्योतिषी नाही, याविषयी माझा अभ्यास नाही, असे त्यांनी स्पष्ट केलंय. डॉ. कोल्हे म्हणाले, माझ्या जगदंब क्रिएशनला उदयनराजे भोसले यांचा कायमच पाठिंबा राहिला आहे. शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे कऱ्हाड येथे पश्चिम महाराष्ट्रात होणारे हे शेवटचे प्रयोग आहेत. त्यानंतर आम्ही विदर्भ, मराठवाड्यात प्रयोग घेणार आहोत.
अलीकडे राष्ट्रवादीच्या कार्यक्रमांना तुमची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरला आहे, यावर ते म्हणाले, माझ्या नाटकाचे जर प्रयोग असतील आणि माझ्या पक्षाचा एखादा कार्यक्रम असेल तर मला उपस्थित राहता येत नाही. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यामध्ये कोणतीही तुलना करण्याची गरज नाही. दोघेही आमच्यासाठी आदरणीय आहेत. पक्षात आमचे नेते शरद पवार सर्व निर्णय घेत असतात. त्यामुळे दोघांपैकी कोणीही मुख्यमंत्री झाला, तरी आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे, असे खासदार कोल्हे यांनी सांगितलं आहे.