Download App

चुकीबद्दल एक भाऊ म्हणून मी माफी मागतो; सुप्रिया सुळेंनी फटकारताच मिटकरींचा माफीनामा

  • Written By: Last Updated:

Amol Mitkari On Supriya Sule : अजित पवार (Ajit Pawar) हे तन, मन, धनाने काम करतात म्हणून सुप्रिया सुळे (Supriya Sule) लोकसभेत निवडूण येतात, असे विधान अजित पवार गटाचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केले होते. यावरून सुप्रिया सुळेंनी मिटकरी यांना जोरदार फटकारले आहे. त्यानंतर अमोल मिटकरी यांनी यूटर्न घेत ट्वीटरवरून सुप्रिया सुळेंची थेट माफीच मागितली आहे. चुकीबद्दल एक भाऊ म्हणून मी माफी मागतो, या शब्दात मिटकरींनी माफी मागितली.

दुधाची तहान ताकावर! मंत्रिपदाचं नंतर बघू, आता किमान महामंडळ तरी द्या : BJP आमदारांची मागणी

फार कमी बहिणी अशा आहेत की त्यांच्या पाठीशी भाऊ उभा राहतो, असे सुप्रिया सुळे यांनी लोकसभेच्या विशेष अधिवेशनाच्या भाषणात म्हटले होते. त्यावर एका सभेत अमोल मिटकरी म्हणाले, फार कमी बहिणी अशा आहेत की की त्यांच्या पाठीशी भाऊ उभा राहतो, असे सुप्रियाताईंचे एक भाषण एेकले. त्यांच्या या मताचे मी शंभर टक्के समर्थन करतो. कारण बारामती लोकसभेत निवडून येण्याकरिता अजितदादा तन, मन, धनाने काम करतात म्हणून सुप्रियाताई अनेक वर्षांपासून लोकसभेत निवडूण येतात.

.@supriya_sule

— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) October 7, 2023

त्यावर सुप्रिया सुळे यांनी अमोल मिटकरी यांना शनिवारी चांगलेच सुनावले आहे. ते बारामती मतदारसंघात दौऱ्यावर होत्या. अमोल मिटकरींच्या विधानावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, तन-मनाने राष्ट्रवादीने लढाई लढली आहे. पण धनाचे राजकारण केले नाही. कधीही करणार नाही. अमोल मिटकरींचा हा गैरसमज आहे की, आम्ही धनाने राजकारण करत आहोत. अजितदादांनी तन आणि मनाने सर्व निवडणुका लढल्या आहेत. दादा आणि मी कधीही धनाने निवडणुका लढलेल्या नाहीत. अमोल मिटकरींना ही मी विनंती करते की, धन, निवडणूक, राष्ट्रवादी पक्ष, पवार कुटुंब याच्यात गल्लत करू नका, असे सुळेंनी फटकारले आहे.

ठाण्यात माफी, नांदेडमध्ये शिक्षा : डॉ. वाकोडेंची जात पाहून त्यांना घरी बसवलं; आव्हाडांचा हल्लाबोल

त्यानंतर अमोल मिटकरी यांनी लगेच माफी मागितली आहे. सुप्रियाताई माझ्या मोठ्या बहिण आहेत. संसदेमध्ये महिला आरक्षणावर त्यांनी जे अभ्यास पूर्ण भाषण केले. त्याला धरून माझे भाषण होते. भाषण कट करून काही भाग त्यांना दाखवण्यात आला. तन-मन-धन हा शब्द मी वेगळ्या अर्थाने वापरला. चुकीबद्दल एक भाऊ म्हणून मी माफी मागतो, असे मिटकरी यांनी म्हटले आहे.