Download App

Amol Mitkari : शरद पवार आव्हाडांची खासगी मालमत्ता नाही, मिटकरींनी सुनावले खडेबोल

Amol Mitkari : रविवारी अजित पवारांनी (Ajit Pawar) थेट शरद पवारांविरोधात बंडखोरी केली. त्यांनी राष्ट्रवादीतील काही आमदारांना सोबत घेऊन शिंदे -फडणवीस (Shinde-Fadnavis) यांच्याशी हातमिळवणी करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवारांच्या बंडामुळं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार चांगलेच आक्रमक झाले आहेत. कोणत्याही बंडखोराने माझा फोटो कुठेही वापरू नये, असा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच विचारसरणीचा विश्वासगात करणाऱ्यांनी शरद पवारांचे फोटो वापरू नये, असं जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, आता जितेंद्र आव्हाड यांना अजित पवारांच्या गटातील आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी चांगलीच सुनावलं. (Amol Mitkari on Jitendra Awhad they said Sharad Pawar is not Jitendra Awhad’s private property)

शरद पवार हे आमच्यासाठी देव आहेत. पक्षाध्यक्षांच्या विरोधात आम्ही कोणतीही भूमिका घेतलेली नाही. मात्र काही लोक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दोन गट फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. ही बाब आमच्यासाठी फार त्रासदायक आहे. शेवटी पवारसाहेब हे आमच्या सर्वांचे श्रद्धास्थान आहे. फुट पाडणारे लोक आता जनतेच्या समोर आले आहेत, असं मिटकरी म्हणाले.

SAFF Championship Final: थरारक सामन्यात कुवेतचा पराभव करत भारत चॅम्पियन 

पवारसाहेब जितेंद्र आवाड यांची खासगी मालमत्ता नाही. शरद पवार राज्याचेच नाही, तर ते देशाचे नेते आहेत. त्यामुळं त्यांचा फोटो लावणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे.

मिटकरी म्हणाले, शरद पवार हे एकट्या जितेंद्र आव्हाडांची मालमत्ता नाहीत. त्यांनी असे बोलू नये, माझी त्यांना विनंती आहे.

दरम्यान, आज नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या दोन गटात राडा झाला. अजित पवार गटाच्या नेत्यांकडून कार्यालयावर ताबा घेण्यात आला. यावरही मिटकरींनी भाष्य केलं. ते म्हणाले, अजित पवार यांनी स्वत: जागा घेऊन प्रत्येक जिल्ह्यात पक्षाचे कार्यालये उभारले आहेत. त्यामुळं कोणी तिथ दावे करू नये, असंही मिटकरींनी सांगितलं.

Tags

follow us