Download App

‘राज्यभरात फिरणे बंद कर नाहीतर संपवून टाकू’, आमदार रवी राणांना जीवे मारण्याची धमकी,

  • Written By: Last Updated:

Maharashtra politics : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकीचा फोन आला होता. त्यानंतर आता अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा यांना देखील जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील अर्जून लोखंडे नावाच्या व्यक्तीने फोन करुन ही धमकी दिली आहे.

या धमकीच्या फोननंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. गेल्या आठ दिवसातील ही तिसरी घटना असल्याने लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी अमरावतीच्या राजपेठ पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

राज्यभरात फिरणे बंद कर नाहीतर जीवाचे बरं वाईट करुन टाकू, संपवून टाकू अशी धमकी दिल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. रवी राणा यांच्या स्वीय सहाय्यकाच्या तक्रारीनंतर राजपेठ पोलीस स्टेशनमध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सर्वांना चांगली खाती मिळतीलच असं नाही; NCP च्या खातेवाटपावर उदय सामंतांचे मोठे विधान

राष्ट्रवादीतील बंडखोरीनंतर धनंजय मुंडे यांना परळी येथील निवासस्थानी हा फोन कॉल आला होता. धमकी देणाऱ्या व्यक्तींनं त्यांच्याकडे 50 लाख रुपयांची मागणी केली होती. यानंतर फोननंतर पोलीसांनी तपास सुरु केला.

सप्तशृंगी गड घाटात भीषण अपघात; बस थेट 400 फूट दरीत कोसळली

छगन भुजबळ यांच्या कार्यालयात धमकीचा फोन आला होता. तुम्हाला मारण्याची सुपारी मला दिलेली असून उद्या मी तुम्हाला मारणार आहे, असं त्या व्यक्तीने म्हटलं होतं. या संदर्भात ऑडिओ क्लिप देखील समोर आली होती. यानंतर पुणे पोलिसांनी धमकी देणाऱ्या तरुणाला अटक केली आहे.

Tags

follow us