Anjali Damania on Sharad Pawar for Beed crime and Dhananjay Munde : बीडमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या गुन्हेगारीची मालिका अजूनही थांबायचा नाव घेत नाहीये. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर गेल्या काही दिवसांत अनेक प्रकरण समोर येत आहेत. आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार यांनी बीडवरील गुन्हेगारीवर टीका केली. त्यावरून आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी शरद पवारांना घेरलं आहे.
विधानपरिषदेसाठी मराठवाड्यातील ‘या’ दोन नावांपैकी एकाला संधी, इच्छुकांची मोठी रस्सीखेच
यावेळी बोलताना दमानिया म्हणाल्या की, बीडमध्ये फक्त पंकजा मुंडे सोडल्या तर सर्व नेते हे शरद पवारांच्या तालमीत मोठे झालेले आहेत. यामध्ये धनंजय मुंडे असो, संदीप क्षीरसागर असो, अगोदरचे जयदत्त क्षीरसागर असो, बजरंग सोनवणे असो हे सर्व पवारांच्या तालमीत वाढले आहेत. ते कसे आहेत काय आहेत. हे सर्व नेते राष्ट्रवादीच्या शरद पवार गटामध्ये आधी होते, त्यांच्याच तालमीत ते मोठे झाले आहेत. आत्ताच्या घडीला जर शरद पवार म्हणत असतील की बीडची स्थिती गंभीर आहे. ते या सगळ्या लोकांना मोठं करण्यामागे तुमचा हातभार किती होता. याचं चिंतन देखील शरद पवारांनी करणे गरजेचे आहे.
काय म्हणाले होते शरद पवार?
आज सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर त्याचबरोबर बीडमधील गुन्हेगारीबद्दल शरद पवारांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावेळी पवार म्हणाले की, मी बीड जिल्हा अनेक वर्षांपासून पाहतो. मात्र आजची जी बीडची अवस्था आहे. ती पूर्वी कधीही नव्हती. बीड शांत सबुरी आणि सगळ्या घटकांना घेऊन जाणारा असा जिल्हा आहे. असा माझा अनेक वर्षांचा अनुभव आहे. मी स्वतः जेव्हा त्या भागात लक्ष देत होतो. तेव्हा तिथे मी उभे केलेले सहा-सहा सदस्य आमदार म्हणून निवडून आले. तिथे एक प्रकारचे सामंजस्याच वातावरण होतं. मात्र आता तेथील काही लोकांनी सत्तेचा गैरवापर करण्याची भूमिका घेतली आहे. त्याचे दुष्परिणाम गेल्या काही महिन्यात बीडमध्ये दिसत आहेत. अशी टीका पवारांनी केली होती.