Another setback for Thackeray in Nashik, former MLA Nirmala Gavit and office bearers join Shinde Sena : विधानसभेला सहा महिने लोटत नाही तोच राज्यात आता मुंबईसह अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत.यासाठी राज्यातील राजकीय पक्षांकडून मोर्चेबांदणी सुरू झाली आहे. त्यातच पक्षांतरांना देखील जोर आला आहे. यामध्ये नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. कारण येथे माजी आमदारासह पदाधिकाऱ्यांचा गोतावळा शिंदेसेनेत दाखल झाला आहे.
बाताश्री शेलार! मुसळधार पावसात मुंबईत वातावरण तापलं… बॅनरबाजी करत शिवसेनेचा आशिष शेलारांवर हल्लाबोल
नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या माजी आमदार निर्मला गावित यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकला आहे. त्यानंतर आता त्यांनी थेट शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश घेतला आहे. यावेळी त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात महिला कार्यकर्त्या देखील शिंदेंच्या सेनेत दाखल झाल्या आहेत. त्यामुळे ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असताना ठाकरे गटाला मोठं खिंडार पडलं आहे.
Manipur Politics : मणिपूरमध्ये पुन्हा भाजप सरकार? 10 आमदारांनी घेतली राज्यपालांची भेट
नाशिकमध्येच स्वत: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.यावेळी गावित यांनी आपली प्रतिक्रीय दिली. त्या म्हणाल्या की, 2019 ला मी एकनाथ शिंदेंच्या मार्गदर्शनाखालीस शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर आता पुन्हा शिवसेनेतच प्रवेश करत आहे. फक्त नेतृत्व बदलल आहे. मात्र पक्ष तोच आहे. त्यामुळे आता मी तालुक्याच्या प्रश्नांना हात घालणार आहे. त्यासाठी आजपासूनच कामाला लागणार आहे. असं यावेळी गावित म्हणाल्या आहेत. दरम्यान यावेळी शिंदेंच्या सेनेत ठाकरे गटाच्या उपनेत्या, पदाधिकारी आणि इगतपुरी, त्र्यंबकेश्वरच्या तब्बल 1500 महिला कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे.