Apmc Election Ahmednagar: नगर कृषी उत्पन्न बाजार समिती पुन्हा एकदा जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले (shivaji kardile) यांच्या ताब्यात आली आहे. चौथ्यांदा कर्डिले गटाची सत्ता या बाजार समितीमध्ये आलेली आहे. सर्व अठरा जागा कर्डिले गटाने जिंकल्या आहेत. कर्डिलेंच्या विरोधात एकवटलेल्या महाविकास आघाडीला हा मोठा धक्का आहे.
पालघर बाजार समितीत महाविकास आघाडीचा डंका; शिंदे गटाला मिळाला भोपळा !
राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शिवाजी कर्डिले व खासदार सुजय विखे यांच्या गटाचा दारुण पराभव झाला होता. त्यामुळे नगर बाजार समितीच्या मतमोजणीकडे लक्ष लागले होती. नगर बाजार समितीमध्ये कर्डिले यांना खासदार सुजय विखे यांची मदत झाली होती. ही बाजार समिती कर्डिल यांच्या ताब्यात होती. या बाजार समितीवर प्रशासक आला होता. त्यामुळे ही बाजार समिती कर्डिलेंच्या ताब्यातून हिसकावून घेण्यासाठी महाविकास आघाडीने चंग बांधला होता. ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत गाडे यांच्या नेतृ्त्वाखाली महाविकास आघाडी तयार झाली होती. राष्ट्रवादीचे राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे, पारनेरचे आमदार नीलेश लंके यांनी या निवडणुकीत लक्ष घातले होते. कर्डिले व विखे यांना मोठे आव्हान दिले होते. थेट भ्रष्टाचाराचे आरोपही कर्डिले यांच्यावर झाला होता.
Latur APMC Election मध्ये देशमुखांचा बोलबाला, भाजपचा पत्ता झाला कट
निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. त्यामुळे कर्डिले यांनी मतदार हे सहलीला पाठविले होते. मतदानाच्या दिवशी कर्डिले व महाविकास आघाडीच्या समर्थकांमध्ये वाद झाले होते. आज झालेल्या मतमोजणी कर्डिले गटाने सर्व जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे कर्डिले यांची पुन्हा सत्ता बाजार समितीवर आली आहे. त्यामुळे नगर तालुक्यांवर कर्डिले यांचेच वर्चस्व असल्याचे सिध्द झाले आहे. या निवडणुकीत लक्ष घालणारे राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे, निलेश लंके, ठाकरे गटाचे शशिकांत गाडे या गटाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे कर्डिले यांनी बाजार समितीची कुस्ती जिंकत लंके, तनपुरे, गाडे यांना चितपट केले आहे.