ठाकरेंचा नाशिक दौरा जाहीर होताच एकनाथ शिंदेंचा धक्का

मुंबईः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटामध्ये ठाकरे गटातून इनकमिंग सुरूच आहे. पक्षाची ताकद वाढविण्याचा प्रयत्न करत असलेल्या उद्धव ठाकरेंना शिंदे एकामागून एक जोरदार धक्के देत आहेत. उद्धव ठाकरे हे नाशिकच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यासाठीच खासदार संजय राऊत हे नाशिकला जात आहेत. परंतु त्याचपूर्वी नाशिकमधील ठाकरे गटाचे काही पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश करून शिंदेंनी ठाकरेंना मोठा […]

Shinde Thackrey

Shinde Thackrey

मुंबईः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटामध्ये ठाकरे गटातून इनकमिंग सुरूच आहे. पक्षाची ताकद वाढविण्याचा प्रयत्न करत असलेल्या उद्धव ठाकरेंना शिंदे एकामागून एक जोरदार धक्के देत आहेत. उद्धव ठाकरे हे नाशिकच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यासाठीच खासदार संजय राऊत हे नाशिकला जात आहेत. परंतु त्याचपूर्वी नाशिकमधील ठाकरे गटाचे काही पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश करून शिंदेंनी ठाकरेंना मोठा धक्का दिलाय.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत हे प्रवेश झाले आहेत. यावेळी नाशिकचे खासदार हेमंत गोडसे, भाऊ चौधरी, अजय गोडसे इतर पदाधिकारी उपस्थित होते. नाशिकमधील ठाकरे गटाचे विभागप्रमुख, विधानसभा प्रमुख यासह विविध पदावरील पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे. नाशिकमध्ये ठाकरे गटाची मोठी ताकद होती. नाशिकमधून खासदार, आमदारही ठाकरेंचे निवडून येतात. परंतु शिवसेनेत फूट पडल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे हे ठाकरेंना एकामागून एक धक्के देत आहेत. आता नाशिकमधील ठाकरे गटातील महत्त्वाची पदाधिकारी, कार्यकर्तेही शिंदे गटात आले आहेत.

नाशिकमध्ये पुन्हा पक्षाला उभारी मिळविण्यासाठी उद्धव ठाकरे हे नाशिकचा दौरा करणार आहेत. यासाठी संजय राऊत हे शुक्रवारी नाशिकला येणार होते. परंतु त्याचपूर्वी ठाकरे गटातील महत्त्वाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे एक मोठा धक्का ठाकरे गटाला बसला आहे.

उद्धव ठाकरे यांची या महिन्यात नाशिकला सभा होणार आहे. या सभेची तयारी ठाकरे गटाकडून सुरू आहे. परंतु त्याचपूर्वी पदाधिकारी हे पक्ष सोडून जात आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यामध्ये डॅमेज कंट्रोल करण्याचे मोठे आव्हान आता ठाकरेंसमोर उभे राहिले आहे.

Exit mobile version