Download App

Assembly election Results 2023: लोकसभेची सेमीफायनल कोण जिंकणार? प्रत्येक अपडेट पाहा लेट्सअपवर !

  • Written By: Last Updated:

Assembly election Results 2023 :लोकसभा निवडणुकीपूर्वीच होत असलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीला (Election Results 2023)वेगळे महत्त्व आहे. ही निवडणूक म्हणजे 2024 ची लोकसभेची सेमीफायनल असल्याचे बोलले जात आहे. हिंदीपट्टातील राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड विधानसभेचा निकाल काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांसाठी महत्त्वाचा आहे. या तीन राज्यांसह दक्षिणेतील तेलंगणा राज्य महत्त्वाचे आहे. या चार राज्यांची मतमोजणी आज रविवारी होत आहे. हे राज्य कोण जिंकणार ? कोण मुख्यमंत्रीपदाचे चेहरे असणार आहे.या निवडणुकीचा लोकसभा निवडणुकीवर परिणाम होईल का ?याबाबतची रिअल टाइम अपडेट लेट्सअपच्या वेबसाइटवर (ttps://letsupp.com ) पाहा.

याचबरोबर आमच्या फेसबुक पेजवर, युट्यूबर तुम्हाला या राज्यांच्या निवडणुकीचे राजकीय विश्लेषण पाहता येणार आहे. मतदानानंतर आलेल्या काही एक्झिट पोलमध्ये छत्तीसगड, तेलंगणामध्ये काँग्रेस बाजी मारले, असे सांगण्यात आले आहे. तर राजस्थानमध्ये भाजपचे सरकार येईल, असा अंदाज काही एक्झिट पोलचा आहे. तर मध्य प्रदेशमध्ये भाजपला बहुमत मिळेल, असा अंदाज आहे. तर काही एक्झिट पोलमध्ये राजस्थानमध्ये काँग्रेस व भाजपमध्ये जोरदार टक्कर असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे चारही राज्यामध्ये काँग्रेस व भाजप या पक्षांमध्ये चुरस आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे राहुल गांधी यांच्यासाठी या राज्यांचे निवडणूक भविष्य ठरविणारी आहे.

बनावट नोटांचे रॅकट उद्धवस्त, NIA कडून महाराष्ट्रासह चार राज्यांत छामेमारी

लोकसभेच्या जागांचा विचार करता मध्य प्रदेश व राज्यस्थान हे दोन्ही राज्य महत्त्वाचे आहेत. मध्य प्रदेशमध्ये दोन्ही पक्षांमध्ये चुरस आहे. त्यामुळे भाजपचे शिवराजसिंह चौहान सत्ते मिळविणार की कमलनाथ हे भाजपकडून सत्ता हिसकावतील हे स्पष्ट होईल. एक्झिट पोलनुसार मध्य प्रदेशचा निकाल एकतर्फी नसेल. काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरस असल्याचा अंदाज काही एक्झिट पोलचा आहे.

राजस्थानमध्ये काय होणार ?

राजस्थानमध्ये काँग्रेसची सरकार जावून तेथे भाजप येईल, असा अंदाज एक्झिट पोलने वर्तविला आहे.दहा पैकी सात एक्झिट पोल भाजपच्या बाजूने आहेत.तर एक्सिस इंडिया, दुडे चाणक्य आणि सीएनएक्सननुसार राजस्थानमध्ये काँग्रेसला शंभर जागा मिळून बहुमत मिळेल.

छत्तीसगडमध्ये काँग्रेस पुन्हा सत्तेत येईल, असा एक्झिट पोल आहेत. येथे काँग्रेसचे भुपेश बघेल यांची जादू दिसणार आहे. तर भाजपच्या काही जागा वाढू शकतात.

तेलंगणात के.चंद्रशेखर राव यांची सत्ता काँग्रेस उलथून टाकेल, असा अंदाज एक्झिट पोलचा आहे. जवळजवळ सर्वच एक्झिट पोलने येथे काँग्रेसला स्पष्ट बहुमत दाखविले आहे.

Tags

follow us