चॅलेंज दिलं, पराभव झाला आता बांगर मिशा कधी काढता?

Hingoli Market Committee Election : हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर याना मोठा धक्का बसला. या बाजार समितीत 17 पैकी 12 जागांवर महाविकास आघाडीचा विजय झाला. दरम्यान या निवडणूकीत बांगर गटाचा पराभव झाल्याने ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या अयोध्या पौळ पाटील (Ayodhya Poul Patil) यांनी बांगर यांच्यावर निशाणा साधला आहे. […]

Untitled Design   2023 05 01T172242.968

Untitled Design 2023 05 01T172242.968

Hingoli Market Committee Election : हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर याना मोठा धक्का बसला. या बाजार समितीत 17 पैकी 12 जागांवर महाविकास आघाडीचा विजय झाला. दरम्यान या निवडणूकीत बांगर गटाचा पराभव झाल्याने ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या अयोध्या पौळ पाटील (Ayodhya Poul Patil) यांनी बांगर यांच्यावर निशाणा साधला आहे. निवडणुकीत पराभव झाला तर मिशा काढेन असे वक्तव्य बांगर यांनी केले होते. म्हणूनच पोळ यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून प्रिय लाडक्या संतोष दादुड्या “मुछ” कधी काढतोय मग? असा खोचक सवाल आमदार संतोष बांगर यांना केला आहे.

नेमकं काय म्हंटले आहे व्हिडिओमध्ये?
ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या अयोध्या पौळ पाटील यांनी ट्विट केलं आहे. ट्विट मध्ये म्हंटले की, दोन दिवसांपूर्वी मी हिंगोली दौऱ्यावर असातना संतोष बांगर यांनी माझ्या समोर येण्याची हिम्मत करत नाही. मात्र माझा दादुड्या संतोष बांगर यांना चॅलेंज करण्याची फार हौस आहे. दोन दिवसांपूर्वी ते माझ्यासमोर म्हणाले, कळमनुरी कृषी उत्पन्न बाजार समितीत 17 पैकी 17 पैकी जागा निवडून नाही आणल्या तर मुछ काढतो…

दादुड्या मी सकाळी उठून तुझ्यासाठी 20 रुपयांचं (रेजर) गिफ्ट आणलं आहे. कधी काढतोस मुछ संतोष दादुड्या? नक्की काढ, असा सवाल अयोध्या पौळ यांनी विचारला. ज्या शिवसेनेने, ज्या ठाकरेंमुळे तुला नाव, पद, पैसा सगळं काही मिळालं. आज तू त्यांना चॅलेंज करतोय. तू स्वत:च्या हाताने स्वतःच राजकीय करिअरला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. मात्र चॅलेंज करताना थोडं मागे पुढे विचार करुन करत जा. कारण हिंगोलीत आजही निष्ठांवत लोक ठाकरेंसोबतच आहे. तुझ्यासारखे पाकिटमार ठाकरेंसोबत नाही, असे पौळ यांनी म्हटलं आहे.

राज्यात कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहे. यातच हिंगोली जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या कळमनुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध शिंदे सेना व भाजप युती अशी सरळ लढत होती. यातच उद्धव ठाकरेंशी बंड झाल्यानंतर शिंदे गटात सामील झालेले आमदार संतोष बांगर यांच्या दृष्टीने देखील ही निवडणूक अत्यंत महत्वाची होती.

बांगर यांचे होम ग्राउंड असल्याने या मार्केट कमिटीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान या निवडणुकीत आमदार संतोष बांगर यांना मोठा धक्का बसला आहे. 17 पैकी 12 जागा जिंकत महाविकास आघाडीने विजयाचा गुलाल उधळला आहे. तर दुसरीकडे नांदेडातही खासदार हेमंत पाटील आणि आमदार बालाजी कल्याणकर याना फटका बसला आहे. यांना नांदेड बाजार समितीत एकही जागा जिंकता आली नाही. 18 पैकी 17 जागा महाविकास आघाडीला देत मतदारांनी बंडखोरांना जागा दाखवून दिल्याचे समोर आले आहे.

Exit mobile version