Bachchu Kadu : काही दिवसांपूर्वी प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu)यांनी शेतकरी, शेतमजूर, वंचित घटकांसाठी सरकारविरोधात दंड थोपाटले होते. अमरावतीत त्यांनी मोठं आंदोलन केलं होत. दरम्यान, आता ते दिव्यांगासाठी मोठं आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. राज्य सरकारने दिव्यांगांच्या निधी संदर्भात योग्य भूमिका न घेतल्यास राज्य सरकारविरोधात बेमुदत उपोषण करण्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.
https://www.youtube.com/watch?v=Qbcr-Nl3sTI
दिव्यांग कल्याण विभागाच्या वतीने दिव्यांगाच्या दारी अभियानांतर्गत आयोजित केलेल्या मेळाव्यात आमदार बच्चू कडू बोलत होते. ते म्हणाले की, राज्य सरकारच्या उत्पादनाचा ५ टक्के निधी हा दिव्यांगासाठी खर्च करण्याचा कायदा असतांना ही राज्य सरकार याकडे दुर्लक्ष करत असल्याचं समोर आलं. राज्य सरकारने दिव्यागांच्या निधी संदर्भात योग्य भूमिका न घेतल्यास राज्य सरकारविरोधात बेमुदत उपोषण करू. सरकारने येत्या काही दिवसांत निधीबाबत योग्य भूमिका न घेतल्यास सरकारविरोधात बेमुदत उपोषण करून सरकारला जागा दाखवू असा इशारा कडू यांनी दिला.
ते म्हणाले, दिव्यांगांसाठी आमदार निधीतून दरवर्षी सुमारे 30 लाख रुपये खर्च करावेत. मात्र राज्यातील 99 टक्के आमदार हा निधी खर्च करत नसल्याचे समोर आले आहे, असे कडू म्हणाले.
गुवाहाटीला गेल्यानं दिव्यांग मंत्रालय
दिव्यांगांसाठी मंत्रालय स्थापन करण्याची मागणी मी गेल्या अनेक वर्षांपासून राज्य सरकारकडे करत आहे. मी आधीच्या सरकारमध्ये होतो. तेव्हा ही मागणी मी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. मी त्यांना म्हणालो, दिव्यांग मंत्रालय करा, हा बच्चू कडू तुमचा गुलाम बनून राहिलं. मात्र, तेव्हा दिव्यांग मंत्रालय झालं नाही. त्यानंतर सर्व आमदार गुवाहाटीला गेल्यावर फडणवीस आणि एकनाथ शिंदेंचा मला फोन आला. मी त्यांना म्हणालो, मी येतोय, पण तुम्ही दिव्यांग मंत्रालय देत असाल तरच येतो. त्यांनी दिव्यांग मंत्रालय करायचं आश्वासन दिल्यानं गुवाहाटीला गेला. बदनाम झालो, पण दिव्यांग मंत्रालय करून घेतलं.