धाराशिव : प्रहार अपंग क्रांती संघटनेचे अध्यक्ष तथा आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू (Bachhu Kadu) यांना न्यायालयाने आठ वर्षांपूर्वी घडलेल्या एका प्रकरणात दिवसभर न्यायालयाचे कामकाज संपेपर्यंत बसून राहण्याची विचित्र शिक्षा सुनावली. धाराशिव (उस्मानाबाद) जिल्हा न्यायालयातील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेश गुप्ता (Rajesh Gupta) यांच्या न्यायालयात या प्रकरणात सुनावणी घेण्यात आली. यामध्ये बच्चू कडू यांच्यासह प्रहार संघटनेचे जिल्हा संघटक बाळासाहेब कसबे, जिल्हाध्यक्ष मयूर काकडे, ज्येष्ठ नेते चंद्रकांत जाधव, बलराज रणदिवे यांनाही न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे.
धाराशिव जिल्हा परिषदेत २ नोव्हेंबर २०१५ मध्ये आंदोलन करण्यात आले. या आंदोलना दरम्यान बच्चू कडू आणि अधिकारी यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा नोंद केला होता. अपंग निधी अखर्चित राहिल्याने प्रहारच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात आंदोलन केले होते. यावेळी बच्चू कडू स्वतः हजर होते. त्यांनी आक्रमक आंदोलन केले होते.
Uddhav Thackeray : ‘छातीवर धनुष्यबाण लावतील तेव्हा कपाळावर चोराचा शिक्का असेल’
२०१५ मध्ये शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी बच्चू कडू तसेच इतर तीन जणांच्या विरोधात धाराशिव शहर पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला होता. या प्रकरणी आज धाराशिव जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश राजेश गुप्ता यांनी कलम ५०६ नुसार बच्चू कडू यांना दोषी धरत कोर्टाचे कामकाज संपेपर्यंत कोर्टात बसून राहाणे व अडीच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. या प्रकरणातील इतर तिघांची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे.