Balasaheb Thorat activist agaressive after Vikhe Khatal appreciate by Kirtankar in Sangamner : अहिल्यानगर जिल्ह्यात संगमनेर शहरातील घुलेवाडी येथे हरिनाम सप्ताहाच्या दरम्यान कीर्तनकार संग्राम भंडारी महाराजांनी कीर्तनामधून राजकीय आणि धार्मिक विषयावरती भाष्य केले. मंत्री राधाकृष्ण विखे व आमदार अमोल खताळ यांच्या कार्याचा गौरव केला. यामुळे कीर्तनाला आलेल्या काहींकडून या ठिकाणी गोंधळ घालण्यात आला. तसेच गोंधळ घालणारे लोक हे माजी आमदार बाळासाहेब थोरात यांचे कार्यकर्ते असल्याचे म्हटले जात आहे. यामुळे पुन्हा एकदा संगमनेरमध्ये विखे विरुद्ध थोरात संघर्ष अधोरेखित झाला. मात्र कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाऐवजी राजकारण केले जात असल्याचा आरोप देखील थोरात यांच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे. नेमकं काय आहे? हे प्रकरण आपण सविस्तर जाणून घेऊ…
ह भ प भंडारे महाराज नेमकं काय म्हणाले?
संगमनेरच्या घुलेवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हभप संग्राम बापू भंडारी महाराजांनी राजकीय भाष्य केले. तसेच धार्मिक विषयांवरही भाष्य केले. हिंदू-मुस्लिम विषयांवरती भाष्य करत असताना भंडारे महाराजांना उपस्थित गर्दीमधील काहींनी अभंगावर निरूपण करा इतर मुद्द्यांवर नको अशी मागणी केली. यावरून उपस्थित असलेल्या हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक झाले.
फर्निचर गोडाऊनला आग, दोन लहान मुलांसह एकाच कुटुंबातील पाच जणांचा गुदमरून मृत्यू…
कीर्तनामधून सुरू असलेले राजकारण व धार्मिक तेढ निर्माण करणारे वक्तव्यावरून काहींनी आक्षेप घेतला. मात्र हिंदुत्ववादी संघटना देखील आक्रमक झाल्याने दोन गटांमध्ये यावेळी तुफान राडा झाला. महाराज मंचावरून निघून जात असताना काहींनी धक्काबुक्की केल्याचं देखील यावेळी सांगण्यात येतआहे. महाराजांच्या वाहनांची तोडफोड देखील करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. घटनास्थळी तातडीने पोलीस प्रशासन दाखल झाले व पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर वाद मिटला पोलिसांनी तातडीने गोंधळ घालणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. तसे संगमनेरचे आमदार अमोल खताळ देखील या प्रकरणावरून चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी महाराजांवरील असे हल्ले आम्ही खपवून घेतले जाणार नाही. अशा शब्दांत इशारा देखील दिलेला आहे.
नेमकं काय घडलं? ह भ प महाराजांनी सांगितले
किर्तन सुरू असताना माझ्यासमोर बसलेल्या एका व्यक्तीकडून विचित्र हावभाव या सुरू होते. मात्र मी ते सहन केलं. त्यानंतर समोरील व्यक्तीने उभा राहून बडबड करण्यास सुरुवात केली. मी त्यांना शांत राहण्याची विनंती केली. मात्र ते ऐकत नसल्याने मी माझ्या सहकाऱ्यांना विनंती केली की, तुम्ही त्यांना बाजूला घेऊन जा. त्यानंतर समोरील व्यक्ती आक्रमक झाली व ती माझ्यावर धावून आली. मात्र वेळीच त्या ठिकाणी हिंदुत्ववादी माझे सहकारी धावून आले. त्यांनी ढालीसारखे माझं रक्षण केलं.
भाजप नेते अनुराग ठाकूर यांना प्रतिज्ञापत्र मागण्याची निवडणूक आयोगत हिंमत आहे का?- संजय राऊत
हिंदुत्ववादी समाज रक्षकांकडूनच मला त्या समाज कंटकापासून वाचवण्यात आले. संगमनेरचा कोणी एकटा माणूस मालक असू शकत नाही. आम्ही हिंदुत्ववादी पोरं हिंदुत्ववादी धर्माच्या रक्षणासाठी प्रयत्न करत राहू. हिंदुत्ववादी आमदार अमोल खताळ हे यांनी तातडीने त्या समाजकंटकावरती गुन्हे दाखल करण्यासाठी प्रयत्न केले. अशा शब्दांत हभप संग्राम भंडारे महाराज यांनी सोशल मीडियाद्वारे पाठवलेल्या व्हिडिओतून आपल्या कार्यकर्त्यांना संदेश दिला.
संगमनेरात आज निषेध मोर्चा
हरिनाम सप्ताहामध्ये झालेल्या गोंधळानंतर आज हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या असून या घटनेच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये आज मोर्चा काढण्यात येत आहे. हभप भंडारे महाराजांवरती माजी आमदार बाळासाहेब थोरात यांचे स्वीय सहाय्यक व सोबतखोरांकडूनच भ्याड हल्ला केल्याचं असल्याचं हिंदुत्ववादी संघटना म्हणतायेत या घटनेच्या निषेधार्थ आज संगमनेर बस स्थानक परिसरामध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात येत आहे.